कारंजा: दि. 5 मार्च रोजी कारंजा पंचायत समिति सभागृह येथे कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचेआमदार राजेन्द्र पाटणी यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत संभाव्य पाणी टंचाई आणि त्यावर उपाय योजना या चर्चा करण्यात आली.अनेक ग्रामपंचायत मार्फत सरपंच व सदस्य यांनी समस्या सांगितल्या त्यावर संबंधित अधिकारी, ग्रामसेवक यांना या विषयी विचारणा करण्यात आली. यात अनेक विषयासंदर्भात आमदार यांनी अधिकाऱ्यांना स्वतः विचारपूस केली आणि निरुत्तर होणाऱ्या अधिकाऱ्यांना समज दिली.अधिकाऱ्यांना निर्देश देत उपाय योजनांची अंमलबजावणी वेळेच्या आत करून अधिकाऱ्यांना येथे उपस्थीत झालेल्या कामासंदर्भात समय निच्छितता सांगितली.पंचायत समिती कारंजा अंतर्गत पाणीटंचाई निवारण व विविध विकास योजनेची आढावा बैठक, कारंजा मानोरा विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजेंद्र पाटणी यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात पाणीटंचाई निवारण व उपाय योजना संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली . पाणी टंचाई करीता नियोजन जाणुन घेवून नियोजन संदर्भात अनेक सूचना करीत अधिकाऱ्यास निर्देश दिलेत.या बैठकीमध्ये तालुक्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख ,तहसीलदार धीरज मांजरे, गिरी उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, उप अभियंता प्रादेशिक नळ योजना उपअभियंता एम एस सी बी, तसेच ग्रामसेवक , सरपंच, पंचायत समिती सदस्य ,जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे सन्माननीय सभापती प्रदीप भाऊ देशमुख भारतीय जनता पक्षाचे तालुकाप्रमुख डॉक्टर राजीव काळे ,युवा मोर्चा प्रमुख विजय काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते .आजच्या आढावा बैठकीमध्ये ज्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होत आहे अशा गावावर प्रामुख्याने लक्ष देण्यासाठी आमदार महोदयांनी आज सूचना दिलेल्या आहेत यामध्ये ग्रामपंचायत गिर्डा,दादगाव महागाव इत्यादी ग्रामपंचायत मध्ये प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे .
ज्या ठिकाणी टँकरची व्यवस्था करणे आवश्यक आहे अशा ठिकाणी तात्काळ टँकरची व्यवस्था पूर्ण करण्याची निर्देश दिलेले आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव प्राप्त करून याची त्वरित तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी अंमलबजावणी करावी कुठलाही ग्रामस्थ पाण्यावाचून राहणार नाही याची आपण सर्व लोकांनी खबरदारी घ्यावी याशिवाय तालुक्या अंतर्गत जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना यांच्यामार्फत ज्या नळ योजना बंद आहेत त्या नळ योजना दुरुस्ती करणे आणि नवीन नळ योजनेची जी कामे आहेत ते त्वरित पूर्ण करण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत. एकंदरीत आजच्या आढाव्यामध्ये पाणीपुरवठा विभागामार्फत 91 ग्रामपंचायत चे नियोजन केलं असून तालुक्यामध्ये 128 गावांपैकी 123 गावाची कामे आपण हाती घेतलेली आहे कारण मागे दोन महिन्याच्या पूर्वी दोन गावांमध्ये योजना झालेली असून तीन गावे नगरपरिषद क्षेत्रामध्ये गेली असल्यामुळे हे गाव आपणाला कव्हर करता येत नाही परंतु तालुक्यातील जलजीवन मिशन मधून ज्या कामाचे टेंडर झालेले आहेत किंवा ज्या कामाचा शुभारंभ आपल्याला करावयाचा आहे तो शुभारंभ तात्काळ करावा .जी कामे मंजूर झालेली आहे त्या मंजूर कामाची यादी सुद्धा माझ्याकडे सादर करावी. अशा सूचना आमदार महोदयांनी दिलेले आहेत.
हे काम सुरू करत असताना कुठल्याही परिस्थितीत कंत्राटदारांना वाढीव मुदत देण्यात येऊ नये ज्या मुदतीमध्ये कामे सुरू करावयाची आहे त्याच मुदतीमध्ये ते पूर्ण करण्याकरिता प्रशासनाने लक्ष घालावं आणि काम हे मुदतीत पूर्ण करावे .ज्या अर्थी शासनाच्या माध्यमातून आपण त्यांना वेळ देतो मुदत देतो तरीही ती कामे, जर पूर्ण होत नसेल तर लोकांना पाणी केव्हा पाजावं हा एक आपल्यासमोर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित राहतो आहे आणि म्हणून अधिकारी वर्गांनी सुद्धा त्याची खात्री करून घेऊन ही कामे वेळेच्या आत पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करावे .अशाही सूचना माननीय आमदार यांनी दिलेल्या आहेत. याप्रसंगी उपस्थित सरपंचाना पण संबोधित केले की आपल्या गावची पाणीपुरवठ्याच्या योजना आहेत त्या त्वरित पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपणही सहकार्य करा व ज्या ज्या ठिकाणी आपणाला वाटत असेल की अतिक्रमण आहे ते अतिक्रमण सुद्धा तात्काळ काढावं. ज्या ठिकाणी इलेक्ट्रिकची बिले थकलेली आहे त्या ठिकाणी सरपंच आणि ग्रामसेवकांनी एकत्र बसून ते इलेक्ट्रिकचे बिल कसे भरता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा आणि महत्त्वाचे असे की आता प्रत्येक गावामध्ये ह्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नवीन पाणीपुरवठ्याच्या योजना मंजूर होत आहेत तर त्या योजना सुरू करत असताना जुन्या योजना फुटू नये किंवा तुटू नये किंवा त्याच्या मधला पाणीपुरवठा बंद होऊ नये यासाठी सरपंचांनी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी नवीन काम सुरू करत असताना गाव सुद्धा पाण्यापासून वंचित राहणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे .नाहीतर एकीकडे आपण नवीन योजना सुरू करतो आहे आणि अस्तित्वात असलेली योजना जर बंद झाली तर त्या गावाला पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो आणि म्हणून हे करत असताना कंपार्टमेंट वाईस काम कसे सुरू करता येईल आणि पूर्ण करता येईल हे बघावं आणि पाण्याचे डिस्ट्रीब्यूशन सुद्धा गावातील लोकांना गरजेनुसार मिळावा याची सुद्धा खात्री सरपंच आणि प्रशासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी अशाही सूचना आमदार यांनी दिल्या .एकंदरीतच आमदार यांनी सर्व सरपंचांना विश्वासात घेऊन प्रत्येक गावांमध्ये आपल्या ग्रामपंचायत मध्ये जी कामे होत आहे ती कामे चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे निकृष्ट दर्जाचं काम होणार नाही चांगल्या क्वालिटीचे काम करावे अशा सूचना दिलेल्या आहेत ही कामे वेळेच्या आत पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही करावी ... या प्रसंगी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेत असताना इतरही योजनेचा आढावा या अनुषंगाने घेण्यात आलेला आहे यामध्ये महाआवास अभियान जे की सर्वांच्यासाठी घर देण्याचा शासनाचा महत्त्वकांशी प्रकल्प आहे या योजनेअंतर्गत आपल्याला सर्वांनाच घर द्यायचे आहे 2024 पर्यंत आणि माननीय पंतप्रधान महोदय सातत्याने याचा आढावा घेतात आणि माझी गटविकास अधिकारी यांना सूचना आहे की त्यांनी या योजनेअंतर्गत पाठपुरावा करून ज्या घटकासाठी ही योजना राबवली जाते त्या घटकाला न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करावा.मी आजच्या सभेमध्ये अशा सूचना देतो की अनुसूचित जमातीच्या लाभ-धारकांना ज्या ज्या लोकांना घर पाहिजे अशा सर्व लोकांची यादी येत्या शनिवार पर्यंत ग्रामपंचायत च्या माध्यमातून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे त्वरित सादर करावी .आपणाला जेवढे उद्दिष्ट पाहिजे तेवढे उद्दिष्ट मी मिळून देण्याचा प्रयत्न करील पण कुठल्याही आदिवासी माणूस हा घरापासून वंचित राहणार नाही याची सर्व सरपंच ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी यांनी काळजी घ्यावी. गटविकास अधिकारी पडघन यांनी महाआवास अभियान योजनेची उद्दिष्ट व वैशिष्ट्य समजाऊन सांगितली आणि आपल्याला कुठली कामे करायची आहे याबाबत सविस्तर माहिती दिली ,या अभियान अंतर्गत 10,11 थीम आहेत त्या 10,11 थीमवर प्रकर्षाने आपल्याला कार्यवाही करावयाची आहे या योजनेअंतर्गत काही नावीन्यपूर्ण बाबीकडे सुद्धा आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये मल्टीस्टोरी हाऊसेस असतील किंवा कन्वर्जनच्या स्वरूपामध्ये इतर योजनेसोबत सांगड करून उदाहरणार्थ एमआरजीएस एसबीआय एमएसईबी बँक इत्यादी सोबत कन्वर्जन करून घरकुल लाभार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा देता येतील या दृष्टिकोनातून कार्यवाही करावी. या अभियानासोबतच आज या वर्षांमध्ये ज्या लाभधारकांनी घर पूर्ण केली आहे अशा पाच लाभ धारकांना आमदार यांच्या हस्ते त्यांना घराचं प्रमाणपत्र व त्यांच्या घराची चाबी,ची प्रतिकृती तयार करून त्यांना आज राहण्यासाठी हस्तांतरित करण्यात आलेलं आहे .याशिवाय महाराष्ट्र जीवन्नोती अभियानांतर्गत जवळपास दहा बचत गटांना 60000 रुपयापासून तर एक लाख रुपये पर्यंत खेळता भांडवलाचा निधी सुद्धा आमदार यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला आहे. या प्रसंगी आमदार यांनी या बचत गटांना अशा सूचना दिलेल्या आहे की या निधीचा वापर चांगल्या कामासाठी करावं याच्यामधून उद्योग आपण तयार करावं आणि आपल्या कुटुंबाचा फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून कार्यवाही करावी या निधीचा कुठल्याही प्रकारे दुरुपयोग होणार नाही याची दक्षता प्रत्येक सदस्यांनी घ्यावी असे आवाहन सुद्धा त्यांनी केलेले आहे.,एकंदरीतच आजच्या सभेमध्ये आमदार यांनी प्रत्येक लाभधारकांना घरकुलाचा लाभ देणे या संदर्भामध्ये सर्व अधिकारी ग्रामसेवक आणि सरपंचांना सूचना दिलेल्या आहेत महत्त्वाची बाब म्हणजे जे अनुसूचित जमाती प्रवर्गात लाभार्थी आहेत आणि ज्यांना खरंच राहण्यासारखी घरं नाही अशा सर्व लाभधारकांचे प्रस्ताव येत्या शनिवार पर्यंत प्रकल्प अधिकारी यांच्याकडे पाठवावे आणि तसे मला अवगत करावे अशा सक्त सूचना आमदार यांनी दिलेल्या आहेत माझ्या निर्वाचन क्षेत्रामध्ये कुठलाही आदिवासी हा घरकुला विना राहणार नाही याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी . अनेक महत्त्वाच्या सूचना देऊन आढावा बैठकीमध्ये आपले मनोगत व्यक्त केले आजच्या कार्यक्रमाचे संचालन साखरे विस्तार अधिकारी पंचायत यांनी केले असून प्रास्ताविक व एकंदरीत योजनेची माहिती एसपी पडघन गट विकास अधिकारी पंचायत समिती कारंजा यांनी दिली या ठिकाणी विविध विभागाच्या अधिकारी यांनी सुद्धा आपल्या विभागाचा आढावा दिला .यामध्ये पाणीपुरवठ्याचे गिरी ,होळकर त्यांचे शाखा अभियंता, एमएसईबीचे देशपांडे यांनी सुद्धा आपल्या विभागाचा आढावा दिला . आमदार यांनी याप्रसंगी असे सुचित केले की एम एस सी बी मार्फत ज्या ठिकाणी लोड शेडिंग होते किंवा ओव्हरलोड डीपी आहे त्या ठिकाणच्या डीपी तात्काळ बद्दलच्या सूचना सुद्धा उप अभियंता एमएसईबी यांना दिलेल्या आहेत तसेच ज्या गावच्या डी पी ओव्हर लोड असतील त्यांनी त्वरीत देशपांडे यांचेकडे सांगावे तसेच तीन दिवसात सर्वप्रस्ताव मार्गी लावण्याचे देशपांडे यांना सांगितले.त्वरित कामे पूर्ण करावीअसे सांगितले. ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण वाटेल त्या ठिकाणी माझ्याशी संपर्क करावा अशा सूचना दिल्यात. असे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार पाटणी यांचे स्विय सहाय्यक संजय भेंडे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळविले आहे .