नागभिड ---चंद्रपूर भारत स्काऊट गाईड कार्यालयामार्फत आयोजित स्काऊट मास्तर व गाईड मास्तर प्राथमिक प्रशिक्षण शिबिरामध्ये समुदाय विकास कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या प्रशिक्षण शिबिरामध्ये स्काऊट मास्तर 46 ,गाईड कप्टन 36 फ्लाक लिडर 12 असे एकुण 94 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा, रक्तदान शिबिर, वाचन प्रेरणा दिन आदींचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रार्थना घेण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेला जितेश सुरवाडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व त्यांच्यासोबत अजय यादव, शिवा मीन्नरवार, रामभवरसिंह हाडा, ताराचंद मेश्राम यांनी मार्गदर्शन करून प्रात्याक्षी क सादरीकरण केले. रक्तदान शिबिर जीवन ज्योती रक्तपेढी नागपुर चे डॉ. नागपल्लीवार, संदीप लडल, श्रावण येणेकार आदींचे मार्गदर्शन लाभले. यावेळी स्काऊट गाईड मिळून 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले. वाचन प्रेरणा दिन निमित्य वाचन संस्कृतीचे महत्व विषद करण्यात आले.
कार्यक्रमाला विजय टोंगे, माजी सरचिटणीस, स्काऊट -गाईड, चंद्रकांत भगत, जिल्हा संघटक, स्काऊट, दीपा मडावी, जिल्हा संघटिका गाईड, सेवानिवृत्त जिल्हा संघटक यशवंत हजारे, किशोर उईके, जिल्हा प्रशिक्षक तथा शिबीर प्रमुख, शिबिर सहाय्यक, प्रमोद बाभळीकर, प्रशांत खुसपुरे, अर्पित कडू, गाईड विभागाकरिता नीता आगलावे, जिल्हा संघटीका तथा शिबीर प्रमुख, कांचन प्रमोद दशमुखे, सहायक शिबीर प्रमुख आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. आपत्ती व्यवस्थापनामध्ये पूर येण्यापूर्वी व नंतर करावयाच्या उपाययोजना, आकस्मित अपघात झाल्यास करावयाचे उपाययोजना, सर्पदंश झाल्यावर च्या उपाययोजना , आगीचे व्यवस्थापण आदी विषयावर मौखिक व प्रात्याक्षिक सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत भगत, जिल्हा संघटक, यांनी केले. तर प्रास्ताविक किशोर उईके, जिल्हा प्रशिक्षक तथा शिबीर प्रमुख यांनी केले. आभार शिबिर सहाय्यक, प्रमोद बाभळीकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता चंद्रपूर भारत स्काऊट -गाईड कार्यालयाच्या सर्व कर्मचारी व प्रशिक्षणार्थी किशोर नरुले,प्रशांत गावंडे,अनराज टिपले,सुधिर जिवतोडे,बादल बेले,अमित कांबळे, सुरेश उरकुडे,व इतर स्काऊट मास्तर, गाईड कॅप्टन रजनी चिलबुले, संध्या कुंभलवार,अर्चना नाईक,स्मिता बानबले शिल्पा डोंगरवार व ईतरही प्रशिक्षणार्थी तसेच कार्यालय कर्मचारी मिथुन किन्नाके,अरुणा काकरे यांनी अथक परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....