किती किती पहायला लावतोस तू वाट ।
आता तरी येऊ दे रे देवा पाऊसाची लाट ॥
दिड महीना झाला तू दिली आम्हाला चाट ।
सोकले रे देवा आमचे सर्व शेतीचे घाट ॥
सोयाबीनने आता माना टाकल्या खाली ।
कोणीच नाही का देवा आम्हचा आता वाली ॥
फूल संपली आता तयार झाल्या कळ्या ।
पाऊस तर नाहीचं पण त्यात पडल्या अळ्या ॥
धोंड्याच्या वर्षात पिक होते मने भरपूर ।
पहील्या पाऊसाने आला होता नद्यांना पूर ।
जळून गेली यावर्षी शेतीच्या माथ्यावरची तूर ॥
पोशींद्याच्या चेह-यावर नाही राहीला नूर ।
जे काही होतं ते सगळंच लावलं जमिनीत सारं ।।
थोडी दया कर घालू नको आम्हाला मातीत ।
दुष्काळ व विम्याच्या पैशाने पोट नाही भरत ॥
पाउस येऊ दे पिक झालं की आम्हचच नाही सरत ।
सोयाबीनच्या भावानं पहीलेच टाकलं कोमात ॥
शेतकरी सोडून इथे सगळेच आहे जोमात ।
देवा आता तरी येऊ दे पाऊस
शेतकरी राजाला ठेव देवा सुखात
कवी : हिम्मत मोहकर, कारंजा (लाड) जि. वाशिम.
आपल्या प्रतिक्रिया द्या....