कारंजा -- देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान राष्ट्रमाता स्व. इंदिराजी गांधी यांनी आपल्या कार्यकाळात अनेक धाडसी निर्णय घेतल्यानंतर जगातील सर्वांत ताकदवान नेत्या म्हणून ला उदयास आल्या. एक वेळ तर त्यांना पराभव सुध्दा स्वीकारावा लागला पण तरीही स्व.इंदिराजी खचल्या नाही.काँग्रेस पक्षासाठी प्रचंड मेहनत घेऊन विक्रमी मताने त्या परत सत्तेवर आल्या आणि या माध्यमातून देशाची सेवा करीत असतांनाच देशासाठी त्यांनी आपले बलिदान दिले.हे बलिदान देश कदापी विसरू शकणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी चे सचिव दिलीप भोजराज यांनी केले.
राष्ट्रमाता इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने आयोजित अभिवादन सभा व सत्कार सोहळ्या प्रसंगी अध्यक्ष पदावरुन दिलीप भोजराज बोलत होते. एकता दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावरही दिलीप भोजराज यांनी थोडक्यात प्रकाश टाकला.
कार्यकमाच्या सुरूवातीला कार्यकमाचे अध्यक्ष दिलीप भोजराज, राजाभाऊ डोणगावकर यांच्या सह उपस्थित सर्व मान्यवरांनी राष्ट्रमाता स्व. इंदिराजी गांधींच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यकमाचे प्रास्ताविक करतांना वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जिल्हा समन्वयक संदेश जैन जिंतुरकर यांनी कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असुन पक्ष मोठा केला तर कार्यकर्ता हा मोठा होत असतो. त्यामुळे कार्यकत्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून जय पराजयाची चिंता न करता एखाद्या व्यक्ति साठी नाही तर काँग्रेस पक्षासाठी झटण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी राजाभाऊ डोणगावकर,अमिर खान पठाण, राज चौधरी,विरेन देशमुख,ॲड वैभव ढगे,उमेश शितोळे, विठ्ठलराव अवताडे,अनिस भाई व ॲड वैभव लाहोटी यांनी आपले मनोगत व्यक्त करुन भविष्यात आपण नेहमीच काँग्रेस पक्षासाठी झटत राहु असी ग्वाही दिली.
या कार्यक्रमात कारंजा शहर काँग्रेस कमेटीच्या अध्यक्ष पदी अमीर खान पठाण यांची फेरनिवड झाल्याबद्दल तर राज चौधरी यांची कारंजा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी, कारंजा मानोरा विधानसभा युवक काँग्रेस च्या अध्यक्षपदी विरेन देशमुख व काँग्रेसच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती जिल्हाध्यक्षपदी विठ्ठलराव अवताडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यकमाचे संचालन अक्षय बनसोड यांनी तर आभार प्रदर्शन उमेश शितोळे यांनी केले.