अकोला:-"लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा" हा संत श्री जगतगुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग सर्वांना माहीत आहे, मी खूप नशीबवान आहे की माझं लहानपण माझ्या आजीआजोबा आणि नाना नानी यांच्या सान्निध्यात गेले. त्यांचे बोलणं, लाड,रागावने,ओंजारणे-गोंजारणे,
खाऊ, रंगीन गोला, कुल्फी करिता
पैसे देने, नवीन कपडे, छान छान गोष्टी, बालगीत, संध्याकाळी शुभंकरोती, हरिपाठ, भजन त्यांच्या अनुभवातून शिकण, त्यांच्ये अनुभव ऐकन, जिवापाड प्रेम करण, ह्या सर्व गोष्टी आता खूप आठवतात. मनाला समाधान वाटते की आपण त्यांच्या सोबत राहीलो. हेच कारण आहे की आम्ही अजुनही मानसिक रित्या कणखर आहोत, कारण त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्यात प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगाला सामोरे जाण्याचा रस्ता आहे. कदाचित मानसिकरित्या समाधान होते, त्यावेळीला ताण-तणाव चिंता या सर्व गोष्टी खूप कमी प्रमाणात असायच्या कारण संयुक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे आपण आपल्या मनातील गोष्टी आपल्यापेक्षा मोठ्यां व्यक्तीला मनमोकळेपणाने सांगू शकत होतो. परंतु आता हा काळ पूर्णतः बदलला आहे आता विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे मुलांना घरातील व्यक्तींबद्दल आत्मीयता प्रेम भावना आपलेपणा ह्या गोष्टी राहिल्या नाही, आणि मोबाईलच्या दुनियेमुळे मुलांचे बालपण हरवले त्यामुळे उन्हाळ्याची सुट्टी नेमकी काय असते हे कदाचित या मुलांना कळणार नाही.