चिमुर--केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्ग यातील उन्नत व प्रगत गटाकरिता क्रिमलेअर साठी असलेली उत्पन्न मर्यादा ६ लाखावरुन ८ लाखांपर्यंत वाढ करुण २०१७ला शासनाने आदेश काढण्यात आला.परंतु दिवसेंदिवस पालकांचे उत्पन्न वाढत पण क्रिमलेअर ची मर्यादा जैसे थे आहे.त्यामूळे अनेक ओबीसी विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहत आहे.त्याचबरोबर ओबीसी विद्यार्थी उच्च शिक्षण प्रवेशापासून वंचीत राहत आहे.
आता राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमुर ने ओबीसी प्रवर्गातील क्रिमलेअर ची मर्यादा ८ लाखावरून १५लाखापर्यत वाढ करण्याची मागणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचे कडे करण्यात आली आहे .
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमुर चे अशोक वैद्य, रामदास कामडी , कवडू लोहकरे,किर्ती रोकडे , प्रा.राम राऊत , अविनाश अगडे , नरेंद्र बंडे, अक्षय लांजेवार,प्रभाकर पिसे , रामभाऊ खडसिंगे, सौ.लता पिसे, सौ.भावनाताई बावणकर, वर्षाताई शेंडे, वंदनाताई कामडी, सौ.सुनिताताई पिसे, सौ.रेश्माताई पंधरे , सौ .दुर्गा चौखे , ईश्वर डुकरे , राजू लोणारे , अरुण लोहकरे , धनराज पंधरे , योगेश थुटे, राजकुमार माथुरकर , ताराचंद बोरकुटे , विनायक हजारे आदी राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमुर चे पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....