वाशिम : आजता गायत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या नेते आणि लोकप्रतिनिधींनी विदर्भाचा निधी पळविण्याचेच गंभीर असे पाप केलेले आहे. त्यामुळे विदर्भ व त्यातही पश्चिम विदर्भ विकासा पासून कोसो दूर राहीलेला आहे.प्रामुख्याने पश्चिम विदर्भात सुशिक्षित बेरोजगारांकरीता कोणतेही प्रभावी असे उद्योगधंदे नाहीत.शिवाय अनेक वर्षापासून येथील शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटांनी तसेच सततच्या नापिकी,शेतमालाला भाव नसल्यामुळे, सावकारी पाशाच्या कर्जबाजारीपणाने आणि अवाढव्य अशा महागाईने त्रस्त होऊन आपल्या विदर्भवासियांकडून वेगळ्या विदर्भाची मागणी देखील होते आहे.महत्वाचे म्हणजे कोरडवाहू शेतकऱ्या करीता सिंचनाच्या सोई, शेतमालाला हमी भाव, उच्चशिक्षणाच्या सोई व उद्योगधंदे नसल्यामुळे जिल्हाच्या मागासलेपणाने वाशिम जिल्ह्याची ओळख आधीच आकांक्षीत जिल्हा असी झालेली आहे.व ही ओळख पुसून वाशिम जिल्ह्यात सिंचनाच्या सोई, शैक्षणिक सुविधा व रोजगाराचे साधन उपलब्ध होऊन,जिल्ह्याचा समावेश विकसीत जिल्ह्यात होण्या करीता येथे स्थानिक मतदार संघातील स्थानिकचा रहिवाशी असलेल्या लोकसभा लोकप्रतिनिधीची आवश्यकता असतांना महायुतीने स्थानिक नेत्यांना डावलून मराठवाड्याच्या रहिवाशी असलेल्या उमेद्वाराला यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाची उमेद्वारी दिल्याने येथील ग्रामस्थ,शेतकरी,मतदार राजा कमालीचा चिडलेला असून, "महायुतीचे पक्ष यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघ हा मराठवाडयाच्या दावणीला बांधल्या जाणार असल्यामुळे स्थानिक मतदारांच्या भावना दुखवील्या गेल्या असल्याचेच मतदाराच्या चर्चेतून दिसून येत आहे." त्यामुळे आता मतदारनेच आपल्या मतदानामधून मराठवाड्याच्या उमेद्वाराला विरोध करण्याचे ठरवीले असल्याचे वृत्त दस्तुरखुद्द मतदारांनी कळवीले असल्याचे आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी सांगीतले आहे.