वाशिम : सामाजिक कार्यकर्ते तरुण क्रांती मंचचे सदस्य तेजस निलेश सोमानी यांना शासनाचा युवक व क्रीडा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने वर्ष.2024-2025 जिल्हा युवा पुरस्काराने रविवार दि.26 जानेवारी 2025 रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र व दहा हजार रुपये धनादेश जिल्हा पोलीस कवायत मैदानावर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. ; जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे,जिल्हा क्रीडा अधिकारी सौ.लता गुप्ता व मान्यवर उपस्थित होते.तेजस सोमानी यांची रामदेव बाबा विद्यापीठ अंतर्गत जापान येथे पंधरा दिवशीय अभ्यास दौऱ्याकरिता निवड झाल्याने हा सन्मान त्याच्या वतीने त्यांच्या मातोश्री ॲड सौ.भारती निलेश सोमानी व बहीण कु.पूर्वा दिदी सोमानी यांनी स्वीकारला.तरुण क्रांती मंच,बाल गणेशोत्सव मंडळ, गुरुदेव सेवा मंडळ व विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तेजसने सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन दायित्व पार पाडले.बेटी बचाव बेटी पढाव पर्यावरण,स्वच्छता, दुर्गम भागात कार्य ,आरोग्य, रक्तदान,महिला सक्षमीकरण, शेतकरी आत्महत्या,जनजागृती अभियान,प्रबोधन,योग,खेळ व क्रीडा समवेत विविध स्पर्धेमध्ये सहभाग तेजसने नोंदविलेला आहे.आतापर्यंत त्याला वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक सन्मान प्राप्त झाले आहे.सोबतच मेळघाट येथील अतिदुर्गम भागात सोमानी दांपत्याच्या वतीने वीस वर्षापासून सुरू असलेल्या सामाजिक कार्यातही त्याने सहभाग नोंदविला होता. सोबतच शिक्षण व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही त्याने उंच भरारी घेतली आहे त्यामुळे त्याची जापान येथे हिरोशिमा नागासाकी या विश्व विख्यात विद्यापीठ येथे अभ्यास दोऱ्या करिता तो रवाना झाला आहे. शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत असतांनाच विदर्भ लोककलावंत संघटना, ज्ञानगंगा साहित्य मंडळ, साप्ताहिक करंजमहात्म्य परिवार, महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार संघटना इ चे अध्यक्ष महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ समाजसेवी संजय कडोळे यांनी कौतुक केले आहे.