केंद्र जोगीसाखरा अंतर्गत प्राथमिक शाळा रामपूर चक येथे सत्र 2022-23 मध्ये शाळेची पटसंख्या 52 होती ती यावर्षीही सत्र 23-24 मध्येही 55 होणार आहे.विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी मागील वर्ष्यापासून शाळा पूर्व तयारी मेळावा भरविण्यात येतो .
या वर्षी शाळेचे मुख्याध्यापक वाटगुरे सर यांच्या संकल्पनेतून गावात मुनारी देऊन व प्रभात फेरी काढून नवखे 15 विद्यार्थ्यांचा स्वागत करण्यात आला.त्यांच्या स्वागत करताना केन्द्र प्रमुख टेम्भुरने, शाळा व्य. अध्यक्ष रुमदेव सहारे,साधन व्यक्ती गिरीपुंजे,मुख्यधापक वाटगुरे, सहाय्यक शिक्षक गुळदे उपस्थित होते.मेळाव्याच्या उदघाटक ग्रा.प.कासवीचे उपसरपंच प्रवीण ठेंगरी, पोलीस पाटील कामिनी राऊत,ग्रापस रेखा राऊत व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.