वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : आपत्ती आपल्या समाजाच्या संपूर्ण सामाजिक जीवन,उपजीविका आणि मालमत्तेवर परिणाम करते. आपत्ती देखील संपूर्ण देशात करुणा आणि नि:स्वार्थ सेवेची भावना जागृत करतात. आपत्तीनंतर समाजातील विविध घटक एकत्र येतात आणि आपत्तींनी प्रभावित झालेल्यांचे दु:ख दूर करण्यासाठी कार्य करतात. आपत्तीची तीव्रता कमी करणे, जोखीम कमी करणे, प्रभावी प्रतिसाद देणे आणि पुन्हा जनजीवन चांगले बनविणे याव्दारे जीव वाचविण्याचे सरकारचे प्रयत्न समुदाय आधारीत संस्था, नि:स्वार्थ स्वयंसेवक, समर्पित स्वयंसेवी संस्था, कर्तव्यदक्ष कॉर्पोरेट, शैक्षणिक आणि संशोधन संस्था आणि व्यक्तींच्या कठोर परिश्रमाने वाढतात. भविष्यातील आपत्तीचा प्रभाव कमी करता यावा,यासाठी अनेक संस्था आणि व्यक्ती शांतपणे परंतु चिकाटीने शमन आणि सज्जतेवर काम करीत आहे.
आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात भारतातील व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या उत्कृष्ठ कार्याचा गौरव करण्यासाठी भारत सरकारने सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार या वार्षिक पुरस्काराची स्थापना केली आहे. यात जास्तीत जास्त तीन पुरस्कार असतील. या पुरस्कारांसाठी संस्था आणि व्यक्ती दोन्ही पात्र आहेत. पुरस्कारार्थी संस्था असल्यास, प्रमाणपत्र आणि ५१ लक्ष रुपयाचे रोख पारितोषिक मिळेल. संस्था या रोख बक्षीसाचा वापर केवळ आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित उपक्रमांसाठी करेल. पुरस्कारार्थी व्यक्ती असल्यास विजेत्याला प्रमाणपत्र आणि ५ लक्ष रुपयाचे रोख पारितोषिक देण्यात येते. एखाद्या संस्थेने केलेला अर्ज त्या संस्थेतील कोणत्याही व्यक्तीस त्याच्या वैयक्तिक क्षमतेनुसार पुरस्कारासाठी अर्ज करण्यास मनाई नाही
नागरीक आणि भारतिय संस्था या पुरस्कारासाठी अर्ज करु शकतात. संस्थात्मक पुरस्कारांसाठी स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट संस्था, शैक्षणिक/ संशोधन संस्था, प्रतिसाद/ गणवेशधारी दल किंवा इतर कोणतीही संस्था या पुरस्कारासाठी अर्ज करु शकतात. कोणताही भारतीय राष्ट्रीय किवा संस्था या पुरस्कारासाठी विचारार्थ उमेदवार नामनिर्देशित करु शकते. उमेदवार स्वत:चे नामनिर्देशन देखील करु शकतात.
पुरस्कारासाठी निकष - अर्जदाराने आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात जसे की प्रतिबंध, शमन, पूर्वतयारी, बचाव, प्रतिसाद, मदत, पुनर्वसन, संशोधन, नवोपक्रम किंवा पूर्व चेतावणी संबंधित कामात काम केलेले असावे. अर्जासोबत आपत्ती व्यवस्थापनात केलेल्या कामाच्या तपशिलांसह असणे आवश्यक आहे. पुढीलपैकी कोणत्याही एक किंवा अधिक क्षेत्रातील उपलब्ध कामास अधोरेखित करणे आवश्यक आहे.
मानवी जीव वाचवणे, जीवन, पशुधन, उपजीविका, मालमत्ता, समाज, अर्थव्यवस्था किंवा पर्यावरणावरील आपत्तींचा प्रभाव कमी करणे. आपत्तीच्यावेळी प्रभावी प्रतिसादासाठी संसाधनांची जमवाजमव आणि तरतूद, आपत्तीग्रस्त भागात आणि समुदायांमध्ये त्वरीत मदत कार्य, आपत्ती व्यवस्थापनाच्या कोणत्याही क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी आणि नाविन्यपूर्ण वापर. धोका प्रवण भागात आपत्ती निवारण उपक्रम. प्रतिसाद आणि जोखीम कमी करण्यासाठी समुदायांची क्षमता निर्माण करणे. रिअल टाईम आधारावर लोकांना आपत्ती धोक्याची माहिती लवकरात लवकर सूचना देणे आणि प्रसारीत करणे. आपत्ती व्यवस्थापनाच्या कोणत्याही क्षेत्रात वैज्ञानिक/ तांत्रिक संशोधन आणि नवकल्पना, आपत्तीनंतरची पुनर्रप्राप्ती आणि पुनर्वसन, आपत्तीच्या काळात गंभीर पायाभूत सुविधा आणि मुलभूत सेवांचे कार्य चालू ठेवणे. सज्जतात आणि जोखीम कमी करण्यासाठी जनतेमध्ये जागरुकता आणि आपत्ती जोखीम व्यवस्थापनाशी संबंधित इतर कोणतेही क्षेत्र.
अर्ज करण्याची प्रक्रीया - www.dmawards.ndma.gov.in या संकेतस्थळावर अर्ज ऑनलाईन केले जातील. वर्षासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट राहील. घोषणेची तारीख- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी २३ जानेवारी रोजी हा पुरस्कार जाहीर केला जाईल.
नियम व अटी - पुरस्कारांचे नियमन करणाऱ्या इतर अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहे. उमेदवाराने दिलेली कोणतीही माहिती चुकीची किंवा कोणत्याही प्रकारे खोटी असल्याचे आढळल्यास उमेदवाराला तीन वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी अपात्र ठरवले जाऊ शकते. स्क्रीनिंग कमिटी किंवा ज्युरी उमेदवाराने सबमिट केलेल्या अर्ज/ कागदपत्रांवर स्पष्टीकरण मागू शकतात. देय तारखेनंतर सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. कोणताही अर्ज नाकारण्याचा अधिकार ज्युरीकडे आहे. तक्रारी असल्यास सचिव एनडीएमए यांना संबोधित केले जाऊ शकते.
सन २०२३ साठी ओडिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि लुंगलेई अग्निशमन केंद्र, मिझोराम या दोन्ही संस्थात्मक श्रेणीतील आपत्ती व्यवस्थापनातील उत्कृष्ट कार्यासाठी सुभाष चंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार - २०२३ साठी निवडले गेले आहेत. या पुरस्कारासाठी अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थळावर ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. असे अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....