कारंजा (लाड) : शासनाने महानगरपालिका,नगर पालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायतमध्ये स्थानिक दिव्यांगाच्या विकासाकरीता 5% दिव्यांग राखीव निधीची तरतूद केलेली असून,सदर निधी हा उत्पन्नाचा स्त्रोत नसलेल्या निराधार दिव्यांगाच्या अर्थसहाय्या करीता असतो. दरवर्षी हा, दिव्यांग राखीव निधी दिव्यांग व्यक्तीच्या बँक खात्यात जमा करण्यात येतो.तरी त्यासाठी दिव्यांगाचे, युडीआयडी कार्ड,आधारकार्ड व उत्पन्नाच्या दाखल्याचे प्रमाणिकरण होणे आवश्यक असल्यामुळे दिव्यांग बांधवांनी आपल्या खात्याच्या प्रमाणिकरणाकरीता १) दिव्यांगाचे ऑनलाईन प्रमाणपत्र २) युडीआयडी कार्ड,३) वार्षिक सरासरी २१,०००/- रु.उत्पन्नाचा तहसिलदार यांचा दाखला,४) नगरसेवक किंवा करनिरिक्षक (टॅक्स इन्स्पेक्टर) यांचे स्वाक्षरीचे हयात प्रमाणपत्र, ५)मोबाईल नं. लिंक असलेले आधारकार्ड, ६) मोबाईल नंबर, ७)बैँक पासबुक इत्यादी कागदपत्र नगर परिषद कारंजा यांचेकडे दि.०२ जुलै २०२४ पर्यंत जमा करावी.असे आवाहन संबंधित दिव्यांग विभागाकडून करण्यात आले आहे.