कारंजा : कारंजा येथील श्री गुरुदेव सेवाश्रम गुरुकुंज आश्रम मोझरीशी संलग्न असलेल्या श्री गुरुदेव सेवा मंडळ सदस्य कारंजा व जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ कारंजाचे अध्यक्ष - विजय पाटील खंडार यांच्या निवासस्थानी, श्री पंचमुखी हनुमान आश्रम इंदोरे त्र्यंबकेश्वर नाशिकच्या गुरुमाऊली महंत सिद्ध साध्वी श्री भगवत्दास श्री श्री १००८ विजयादेवी यांचा विजय पाटील खंडार यांच्या हस्ते, शाल, श्रीफळ,पुष्पमाला,कारंजेकरांचे आराध्य दैवत श्री गुरुमाऊली यांची मूर्ती व ग्रामगीता देवून भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी अंधश्रद्धा व्यसनाधिनतेवर आध्यात्मिक व धार्मिक प्रवचनामधून प्रहार करणारे अभ्यासक, संजय कडोळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होते. तसेच हभप गोपाल महाराज ठिलोरकर, ओंकार मलवळकर, उमेश अनासाने, रामबकस डेंडूळे, दर्शन पाटील खंडार, हभप माणिक महाराज हांडे, बाळकृष्ण काळे इत्यादींची उपस्थिती होती. साध्वी श्री श्री विजयादेवीजी यांनी उपस्थित भाविक भक्त मंडळीना भरभरून आशिर्वाद देतांना, "आपल्या धर्मातील आध्यात्मिक संस्कृती टिकविण्यामध्ये,वैदर्भिय संतमहात्म्यांचे आणि प्रामुख्याने श्रीगुरुदेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे मोलाचे योगदान असल्याचे सांगून त्यांच्या कार्याचा आपआपल्या परीने प्रचार प्रसार करण्याचे सुचवीले."असे वृत्त विजय खंडार यांनी कळविले आहे.