विनापरवानगी अवैध वाळुचा उपसा करून ती वाळू ट्रॅक्टरने वाहतूक करीत असतांना MH 33 - 1276 या क्रमांकाची ट्रॉली असलेला ट्रॅक्टर विद्यानगर ब्रम्हपुरी परिसरात भर दिवसा बुधवार ला 10 वाजता पकडला गेला. तपासणी अंती वाहन चालकाकडे कुठलाही परवाना ( रॉयल्टी ) नसल्याचे निष्पन्न झाले. मात्र काहींचा ट्रॅक्टर सोडून देण्याकरिता दबाव येत असतांना कुठल्याही दबावाला न जुमानता आपले कर्तव्य निभावत ट्रॅक्टर तहसील कार्यालयात नेत असतांना ब्रम्हपुरी येथील सुपर एन्ट्रीचा सेटिंग मास्टर म्हणून ओळखला जाणारा वृद्ध माजी कोतवाल, तलाठी पवार यांना दबाव टाकत ट्रॅक्टर सोडण्यास बोलत असता अचानक एक प्रतिनीधी तिथे आल्याने सेटिंग मास्टर ला मात्र पळता भुमी कमी झाल्याचे बघायला मिळाले व सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करून तलाठी पवार यांनी पुन्हा आपल्या कर्तव्यदक्षतेचा परिचय करून दिला.
तर याच दरम्यान उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांनी एन. एच. कॉलेज परिसरात बोंडेगाव येथे अश्याच प्रकारे विना परवाना वाळूची वाहतूक करीत असलेला विना नंबरचा लिहिले असलेले ट्रॅक्टर पकडुन तहसील कार्यालयात जमा करून आपले कर्तव्य बजावले.
ब्रम्हपुरी तालुक्यात हि घटना नवीन नसुन रोजच राजरोस पने दिवसा ढवळ्या ट्रॅक्टरनेच नाही तर ट्रॅक हायवा, टिप्पर ने सुपर एन्ट्री च्या नावाने अवैध वाळू वाहतूक केली जात असून या मोठ्या तस्कारावर मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात येत नसल्यानें आजची अवैध वाळू तस्करांवरील केलेली कार्यवाही कोटा रेट असल्याचीही लोक चर्चा सूरू आहे.