चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपूरचे विभागीय कार्यालय ब्रह्मपुरी अंतर्गत ४ तालुक्यात खरीप हंगाम पीक कर्ज वाटप १४७५१ सभासदांना ७० कोटीचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. खरीप हंगामाची तयारी आमचे शेतकरी सभासदांनी केले असून अर्थसाहाय्य घेउन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विभागीय कार्यालय ब्रह्मपुरी त्यांचे पाठीशी सक्षम पणे उभे असून ४ तालुक्यातील २७५०० शेतकरी सभासदांना १२५ कोटी चे खरीप पीक कर्ज वाटप करण्याची तयारी व नियोजन करण्यात आले आहे. आणि सहकारी संस्था चे शेतकरी सभासदांना खरीप हंगामात कोणतेही अडचण भासू नये याकरीता पिक कर्ज वाटपाचे माध्यमातून बँकेच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे.
तालुकानिहाय पीक कर्जवाटप झाले आहे.कर्ज वाटप सभासदाना रक्कम मिळाली आहे.
सहकारी संस्थाचे व माननीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ब्रह्मपुरी तसेच बँक अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने १४७५१ सभासदांना ७० कोटी पिक कर्ज वाटपाची रक्कम शेतकऱ्यांचे खात्यात जमा करण्यात आली आहे.
सदर माहिती ब्रह्मपुरी विभागीय कर्ज समिती माननीय संदीप वामनराव गड्डमवार तसेच विभागीय अधिकारी .महेंद्र मातेरे यांनी दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाचे शेतकरी बांधवांच्या वतीने सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.