हा संप प्रामुख्याने सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आहे. बँकेने 2021 मधे सफाई कर्मचारी है पद रदद केले. हे काम आऊटसोर्स केले. त्यांना किमान वेतन देखील दिले जात नाही कायमस्वरुपी कामगारांचे फायदे जसे की रजा मेडिकल सुट्ट्या कांहीच मिळत नाही. या पदावर अनेक वर्षांपासून तात्पुरत्या पदावर काम करणारे हजारो कर्मचारी यामुळे रस्त्यावर आले आहेत. बँकेत 700 शाखेतून नियमित शिपाई नेमण्यात आले नाहीत बैंकेत 318 शाखा आहेत जेथे एकही क्लार्क नेमण्यात आला नाही. 1290 शाखा आहेत जेथे केवळ एक क्लार्क आहे जो कॅश मध्ये काम करतो यामुळे कर्मचाऱ्यांना वेळ संपली तरी जास्त वेळ बसून काम पूर्ण करून जावे लागते. सुट्टीच्या दिवशी कामावर यावे लागते आजारपण असो की संसारिक जबाबदाऱ्या यासाठी आवश्यकतेनुसार राजा मिळत नाही काम आणि वैयक्तिक आयुष्य यातील समतोल बिघडला आहे कर्मचारी सतत ताण-तणावात काम करत आहेत. त्यामुळे सतत आजारी पडत आहेत
याचा ग्राहक सेवेवर देखील विपरीत परिणाम होत आहे. एकीकडे ग्राहकांची संख्या वाढली आहे, त्यांच्या आपेक्षा वाढल्या आहेत तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांची संख्या मात्र कमी झाली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांचा आग्रह आहे की बँकेने त्वरित सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांची पुरेशी भरती करावी.
याशिवाय कमी कर्मचाऱ्यात अधिक काम, यात बँकेचे नियम काटेकोरपणे पाळल्या जात नाहीत आणि त्यातूनच फाँड होण्याची शक्यता निर्माण होतआहेत. यात बँकेचे तसेच ग्राहकांचे नुकसान होत आहे. याला जबाबहार कोण ? बैंक यावर संवेदनशील नाही म्हणूनच 20 मार्चला महाबैंकेत संप अटळ बनला आहे.
या शिवाय बैंक कर्मचारी संघटनांशी केलेले करार, हायकोर्टाचे आदेश सगळेच धाब्यावर बसवून बैंक व्यवस्थापन मनमानी करत आहे. यामुळे कर्मचाऱ्यात संतापाची भावना निर्माण झाली आहे
आज महा बँकेतील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा एक कार्यक्रम बँक ऑफ महाराष्ट्र झोनल ऑफिस अकोला समोर सकाळी 10.00 ते सायंकाळी 5:00 पर्यंत धरणे धरली व सायंकाळी पाच वाजता स्थानिक इतर बँकेतील कर्मचाऱ्यांच्या सहभागातून प्रखर निदर्शने केली ज्यात 80 वर कर्मचारी सहभागी झाले होते. यानंतर झालेल्या सभेत बोलताना संघटनेचे पदाधिकारी प्रवीण महाजन यांनी असे सांगितले की आजच्या दिवशी क्लार्कच्या दोन हजार शिपायांच्या एक हजार तर सफाई कामगारांच्या 2500 जागा रिकाम्या आहेत त्या त्वरित भरण्यात याव्यात अशी संघटनेची मागणी आहे ज्याचा केवळ कर्मचाऱ्यांनाच त्रास होत नाही तर ग्राहक सेवेवर देखील स्थापित परिणाम होत आहे याशिवाय यामुळे बँकेत फ्रॉड देखील होत आहेत. महा बॅंकेच्या ग्राहकांनी आमची भूमिका समजून घ्यावी आणि आमच्या संपाला पाठिंबा द्यावा असे संघटनेतर्फे नम्र आवाहन कराग्यात आले आहे.
हा धरणे कार्यक्रमाला सतीश धुमाळे शैलेंद्र कुलकर्णी शुभांगी मानकर पुनम अग्रवाल शिल्पा ढोले प्रांजली निबंध राधा वानखडे श्याम वानखेडे किशोर आलेकर अविनाश आखरे विशाल गायकवाड सुमित ठाकरे संतोष गायकवाड देवलाल शिरसाट, विजय तायडे, शिवराज पाटील शुभम लांडे जितेंद्र येळमे इत्यादी सहित जवळपास 60 पेक्षा अधिक कर्मचारी उपस्थित होते धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे आशिष गोसावी बँक ऑफ इंडियाचे उमेश शेळके बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशन चे दीपक लबडे अमृत राठोड सहित इतर बँकेतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती प्रवीण महाजन यांनी दिली आहे .