नगर परिषद ब्रह्मपुरी हे विदर्भातील भात शेती, शिक्षण व वैद्यकीय उपचार या बाबत अग्रगण्य तालुका आहे .तसेच ब्रह्मपुरी शैक्षणिक व सांस्कृतिक शहर म्हणून ओळखला जातो. शहराच्या पूर्वेकडे गडचिरोली जिल्ह्याला लागून वसलेले आहे. सदर तालुका हे ब्रह्मपुरी -सावली विधानसभा क्षेत्रात येत असून सुमारे तीन लाखाच्या घरात लोकसंख्या आहे. ब्रह्मपुरी शहरात बारा वर्षापासून कुंकुसापासून खाद्यतेल निर्माण करणारे मोठे नामांकित रामदेवबाबा सालवंट प्लांट उभारण्यात आले व ब्रम्हपुरी -आरमोरी, ब्रह्मपुरी- वडसा ,ब्रह्मपुरी- नागभिड रस्त्यालगत असलेल्या राईस मिल मुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते आहे. त्यांचा त्रास सर्वसामान्य जनतेला मोठया त्रास होत आहे . त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे ब्रह्मपुरी नगरपरिषदचे नगरसेवक तथा नियोजन सभापती महेश भर्रे यांनी भेट घेऊन निवेदन दिले. सदर रामदेवबाबा सालवंट प्लांट व रोड लगत असलेल्या राईस मिलवर कठोर कारवाई करू असे भेटी दरम्यान आश्वासन दिले.
सदर उद्योगातील प्रदूषणामुळे सर्वसामान्य व मध्यमवर्गीय व्यक्तींचे, शेतकर्यांचे जगणे कठीण होऊन बसले आहेत .सदर प्रदूषणकारी उघोगामुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचे आजार, अस्थमाचे आजार इत्यादी गंभीर आजार जडू लागलेले आहे. मात्र याबाबत उद्योगाचे संचालक यांच्याकडून प्रदूषण निवारण संदर्भात कोणतेही प्रभावी व ठोस उपाय योजना केल्या जात नाही ही बाब जनतेच्या प्राण व दैहीक संविधानिक अधिकारावर स्पष्टपणे गदा आणत आहेत. ब्रम्हपुरी तालुका ,नगर परिषद क्षेत्र व आसपासच्या तालुक्यातील जनतेला रामदेवबाबा सालवंट प्लांटचे संचालक व ब्रह्मपुरी तालुक्यातील मोठे राईस मिल चे संचालक प्रदूषण मंडळातील अधिकाऱ्यांच्या मिलीभगतामुळे प्रचंड प्रमाणात जल,वायु ध्वनी प्रदूषणाचा जीवघेणा सामना करावा लागत आहे.तसेच रोड लागून असलेल्या राईस मिल संदर्भात वरिष्ठ अधिकारी उद्योजक उद्योगपती यांची साठगाठअसल्यामुळे जाणीवपूर्वक सर्वसामान्य पीडीत ग्रस्त शेतकरी व सामान्य नागरिक गेल्या दोन -तीन वर्षाच्या त्यामुळे आर्थिक बाजू एकदम कमकुवत झालेली आहे . त्यामुळे सर्वसामान्य जनता आवाज उठविण्याची हिंमत करीत नाही. विशेष म्हणजे प्रदूषणकारी उद्योगांवर विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या व प्रदूषणकारी उद्योजकांच्या संचालकास सहाय्यक करणाऱ्या प्रादेशिक अधिकारी व उप प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ चंद्रपूर विभाग चंद्रपूर यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी याकरिता महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ब्रह्मपुरी नगर परिषदचे नगरसेवक तथा नियोजन सभापती महेश भर्रे,नगरसेवक दिपक (बाला)शुक्ला, नगर परिषद माजी उपाध्यक्ष बंटीभाऊ श्रीवास्तव उपस्थित होते.