कारंजा (लाड) : शहरातील प्रतिष्ठित हायफाय असलेल्या सोसायटीत दिवसा ढवळ्या ११ : ०० ते १२:०० वाजेदरम्यान चोरांनी ईरशाद लुलानिया यांचे समोरून जाऊन, जिल्हा परिषद शिक्षक असलेल्या जाकिर शेख यांच्या घरी घरफोडी करीत चोरी करण्यासाठी घराचे कुलूप फोडण्याचा प्रयत्न केला असता, शेजारच्या बंगल्यातील एक महिलेने त्यांना प्रत्यक्ष पाहून हटकण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एका चोरट्याने जवळचे धारदार शस्त्र दाखश सदर महिलेला घरात जाण्याचा इशारा केला. त्यावेळी महिलेने प्रसंगावधान राखून केलेल्या आरडा ओरड्याने चोरांचा डाव फसून त्यांनी आपल्या वाहनातून पळ काढला. त्यावेळी धावपळीत त्यांच्या जवळची नायलॉन पिशवी खाली पडली. पिशवीमध्ये खंजर सारखे धारदार अवजार आणि पेचकस वगैरे असल्याचे दिसून आले.या प्रकरणात अंदाजे दोन ते तिन चोरटे असावेत. त्यापैकी एका चोराचे डोक्याचे घुंघराले केसं असून तो उंचपुरा असल्याचे कळते.घटनास्थळी आलेल्या पोलीसांनी सी सी टि व्ही पुटेजवरून कारंजा शहर पोलीस चौकशी सुरू केल्याचे कळते. मात्र या प्रकरणावरून चोरट्यांना पोलीस व कायद्याचा धाक उरलेला नसून,भरदिवसा उच्चभ्रू सोसायट्या मधील नागरीक व विशेषतः महिला सुरक्षित नसल्याचे सिद्ध होते. त्यामुळे पोलीस विभागाने डोळ्यात तेल घालून चोरांच्या मुसक्या आवरणे जरूरी झाले आहे.