कारंजा (लाड) : आपल्या १००% अचूक हवामान अंदाजा करीता जनविख्यात असलेले वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्याच्या, ग्राम रुई (गोस्ता) येथील हवामान विशेषज्ञ यांनी दि. 16 डिसेंबर रोजी जाहीर केलेल्या अंदाजानुसार जानेवारीत ढगांचा गडगडाट आणि विजांच्या लखलखाटासह पाऊस पडणार आहे.त्यांचा अंदाज अचून ठरत असल्याचे अनुभवातून सिद्ध झाल्याने आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी भ्रमण ध्वनीवरून हवामान विशेषज्ञ गोपाल गावंडे यांचेशी संवाद साधला असता त्यांनी सांगीतले की,सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण,शितलहरी आणि गारव्याचे प्रमाण चढउतारात राहणार आहे.तसेच पुढील वर्षी 09 जानेवारी 2024 रोजी मध्य महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात रिमझीम ते साधारण पाऊस पडेल.तर दि.10 व 11 जानेवारी रोजी विजाच्या कडकडाटासह अवकाळीची जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची दाट शक्यता असून, दि.14 व त्यानंतर दि.23 जानेवारी रोजी हलक्या सरींचा साधारण पाऊस होईल." असे वृत्त आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी प्रसिद्धीला दिले आहे.