कारंजा (लाड) : महाराष्ट्र शासनाने शासनाच्या मुख्यमंत्री वयोश्री योजने प्रमाणे निराश्रित व बेघर दिव्यांगाकरीता,मुख्यमंत्री निराधार दिव्यांग योजना सुरु करून,निराश्रीत व बेघर असलेल्या दिव्यांग आणि निराधारांना आवश्यक सहाय्यता साधने घेण्याकरीता आर्थिक सहकार्य कमितकमी दहा हजार रुपये देवून मदतीचा हात द्यावा. तसेच बेघर दिव्यांग निराधार व्यक्तींना नगर पालिका,नगर पंचायत आणि ग्रामपंचायत क्षेत्रात भूखंडासह तयार घरकुलं बांधून द्यावीत.अशी मागणी महाराष्ट्र अपंग संस्था कारंजाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी महाराष्ट्र राज्य दिव्यांग महामंडळ मुंबईचे विद्यमान अध्यक्ष बच्चुभाऊ कडू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना एका पत्रान्वये केलेली असून,तमाम महाराष्ट्रातील राजकिय नेते,मंत्री, खासदार,आमदार,जिल्हा परिषद व नगर परिषद सदस्यांनी दिव्यांगा करीता ही मागणी त्यांच्या स्तरावरून शासनाकडे लावून धरावी.आणि जिल्हा परिषद,नगर परिषद यांनी तसेच दिव्यांग संस्थानी आपल्या संस्थेचे ठराव घेऊन शासनाकडे दिव्यांग व निराधाराच्या भूखंडासह घरकुला करीता व साधनसामुग्री खरेदीसाठी दरवर्षी दहा हजार रुपये आर्थिक सहकार्य मिळण्यासाठी (प्रस्ताव) पाठवावेत.असे आवाहन केले आहे.