कारंजा: राष्ट्रिय काँग्रेस मधील जुने जाणते हिंदु मुस्लिमांमधील एकमेवाद्वितीय लाडके लोकप्रिय नेते तथा कारंजा नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया हे स्थानिक राष्ट्रीय काँग्रेसचे भिष्म पितामह म्हणून ओळखल्या जातात.त्यांच्या प्रामाणिक, हजरजवाबी,मनमिळाऊ स्वभाव, चेहऱ्यावर सदोदीत हास्य व विश्वासार्हतेमुळे, ते केवळ कारंजा मतदार संघच नव्हे तर संपूर्ण वाशिम जिल्ह्यासह यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात त्यांना मानणारा फार मोठा हिंदु मुस्लिम,जैन,बौद्ध , बंजारा व इतर सर्वधर्मिय जनसमुदाय त्यांच्या सोबत असल्यामुळे त्यांच्या शब्दाला मतदारांमध्ये वजन आहे.त्यामुळे त्यांनी महाविकास इंडिया आघाडीचे उमेद्वार संजय देशमुख यांना कारंजा शहरातून भरघोस मतदान मिळवून देण्याची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली असून त्या दृष्टिने त्यांनी बुधवार दि.17 एप्रिल 2024 रोजी स्थानिक लाहोटी जीन दिल्ली वेस येथे प्रदेश काँग्रेस कमेटीचे सदस्य जिल्हा परिषद गटनेते सुनिल धाबेकर,जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ ज्योतिताई गणेशपुरे, माजी उपाध्यक्ष जुम्मा पप्पूवाले, माजी उपाध्यक्ष एम टी खान, काँग्रेसचे राजकुमार लाहोटी, बाजार समिती माजी उपसभापती अशोक मुंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य उस्मान गारवे, गवळी समाज अध्यक्ष जुम्मा बंदुकवाले, माजी संचालक कृउबास कासमभाई,राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार), दिलीप रोकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रऊफ खान मामू, माजी सरपंच तथा ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते प्रदिप वानखडे,तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष राज चौधरी,पंचायत समिती माजी सभापती श्रीकृष्ण पाटील लाहे,तालुका कॉग्रेस सेवादल अध्यक्ष विजय पाटील,ओंकार काकडे,खरेदी विक्री संचालक विठ्ठलराव लाड, वाहतूक सेनेचे माजी अध्यक्ष सलिम तेली,बाबाराव पाटील ठाकरे,शहर कॉग्रेसचे अमिरखान पठान,राजिक शेख,ॲड.फारूकखान कडू,माजी नगरसेवक ईरशादभाई,जहिरभाई इत्यादींची उपस्थिती होती.यावेळी सुनिल धाबेकरअरविंद लाठिया इत्यांदीनी मार्गदर्शन करतांना, "जनसामान्यांच्या हितासाठी आणि मतदार संघाच्या विकासासाठी मतदार संघातील स्थानिक उमेद्वार संजय देशमुख यांचे मशाल चिन्हाचे बटण दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले. त्यानंतर गुरुवार दि 18 एप्रिल 2024 पासून प्रचारार्थ गृहभेटीला सुरुवात करून दारव्हा वेस, पंचशिलनगर,मंगलवारा,दाईपूरा इत्यादी भागात घरोघरी मतदारामध्ये जनजागृती करीत नवचैतन्य निर्माण केले. यावेळी प्रचार फेरीत महाविकास आघाडीचे स्थानिक नेते व बहुसंख्येने कार्यकर्ते सहभागी होते तसेच मतदान जनजागृती बद्दल स्वतः मतदार उत्साही दिसत होते असे वृत्त राजिक शेख, प्रदिप वानखडे, सलीम तेली यांनी सांगीतले असल्याचे वृत्त आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....