वाशिम : शालेय विद्यार्थी व नागरिकांना अंतराळाची व भारतीय वैज्ञानिकांची माहिती मिळावी.या उदात्त हेतूने शहरातील निर्माणाधिन टेंम्पल गार्डनमध्ये तारांगणाची उभारणी करण्यात आली.यासाठी शासनाचा कोट्यावधीचा निधी उधळण्यात आला.परंतू सदर तारांगण जनसेवेत रुजू होण्यापूर्वीच जळून खाक झाले. या घटनेला तीन वर्षापेक्षा अधिकचा कालावधी उलटला असला तरी पालिका व पोलीस प्रशासनाला याचा छडा लावण्यात यश आले नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा पैसा केवळ उधळण्यासाठीच आहे का ? असा प्रश्न शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख डॉ. विशाल सोमटकर यांच्या नेतृत्वात निवेदन देवून मुख्याधिकाऱ्यांना विचारण्यात आला.जिल्ह़याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे भ्रामक आश्वासन देवून अनेकांनी सत्ता उपभोगली. दरम्यानच्या काळात शहरात नगर पालिकेची नवी इमारत उभारण्यात आली. तर याच इमारती समोरच्या शासकीय खुल्या जागेत टेम्पल गार्डन उभारण्याची संकल्पना समोर आली.या शिवाय मनोरंजनातून भावी पिढीला विज्ञानाचे ज्ञान व्हावे.या उदात्त हेतूने या जागेवर अत्याधुनिक तारांगण उभारण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करुन कोटयवधीचा निधि मिळवून तारांगण उभे केल्या गेले.त्यामुळे वाशिम शहराला ‘मेट्रो सिटी’चा लुक आल्याचे बोलल्या जावू लागले.मात्र,सदरचे तारांगण शहरवासियांसाठी ‘मृगजळ’ ठरले. सदर तारांगन उभे झाले.यानंतर संबंधीत कंत्राटदाराने आपली देयके वसुल केल्यानंतर कोणतीही वीज जोडणी नसतांना अचानक तारांगणाला आग लागली आणि कोट़यवधीची संपत्ती बेचीराख झाली.विशेष म्हण्जो या वास्तुतील जळालेल्या वस्तुचे अवशेष देखील येथे मिळून आले नाही. दरम्यान ‘नेमेची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे पालिका प्रशासनाने पोलीसात तक्रार देवून आपली जबाबदारी झटकली तर पोलीस प्रशासनाने चौकशी सुरु असल्याचे कारण सांगून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना शहराध्यक्ष डॉ.सोमटकर यांनी निवेदनातुन केला असून या घटनेची सखोल चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे.सदर निवेदन देते वेळी कैलास थोरात,शाम खरात,मो.साबीर, सुरिंदरसिंग सेठी,अब्दुल आकीब, राजू पुणेवाड, अनील भडके, सूधाकर कुटे,मदन भडके,गोपाल सारसकर, प्रदीप जाधव,संदिप कांबळे,सागर भगत,अक्षय घुगे,निखील खडसे,आदिंसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.