तालुक्यातील चिंचोली बुजुर्ग गावातील सुंदरा सुखदेव शिंगाडे हि महिले कॅन्सर या आजाराने ग्रस्त असल्याचे काँग्रेस कमेटी च्या कार्यकर्त्यांनी मा. नामदार -विजयभाऊ वडेट्टीवार विरोधी पक्षनेते विधानसभा महाराष्ट्र राज्य यांना कळविली व त्यांनी लगेच या महिलेला आर्थिक मदत पाठविली.
मदत देतेवेळी मालडोंगरी पिंपळगाव क्षेत्राच्या जि. प. सदस्या सौं. स्मिताताई राजेश पारधी, मा. राजेश तलमले संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रह्म., रामलाल ढोरे उपसरपंच चिंचोली, राजेश पारधी कोषाध्यक्ष ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटी, गुड्डू बगमारे उपाध्यक्ष ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटी, महादेव राऊत अध्यक्ष काँग्रेस कमेटी सुरबोडी, हरिदास शिंगाडे ग्रा. प. सदस्य, रघुनाथ पारधी माजी पोलीस पाटील, लक्ष्मण भुररे, रोशन मेश्राम, बाबुराव बरडे व गावकरी उपस्थित होते