कारंजा : हिवाळी अधिवेशनात, साहित्यीक व लोककलावंताचे प्रश्न प्रकर्षाने मांडून, सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र शासनाच्या "वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन " योजनेचे मानधन वाढविण्यात यावे या मागणी करीता, नागपूर अधिवेशनात जात असलेल्या लोककलावंताशी, मार्गात गुरुकुंज मोझरीजवळ, अमरावती विधान परिषद मतदार संघाचे शिक्षक आमदार ऍड किरणराव सरनाईक यांचेशी विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे, प्रदिप वानखडे, गोपिनाथ डेंडूळे, विजय पाटील खंडार, हभप अजाब महाराज ढळे, सुनिल गुंठेवार, उमेश अनासाने, नगसेविका सौ चंदाताई कोळकर, पर्यावरण सेविका सौ सिमाताई सातपुते, सौ चंदाताई माने, पांडूरंग माने, नंदकिशोर कव्हळकर, सुनिल फुलारी, किरण क्षार, ऍड संदेश जिंतुरकर, गणेश बाबरे यांनी सवांद साधून, त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटून कलावंताचे मानधन वाढाविण्याची मागणी केली असता निश्चितच मी माझ्या वतीने १००% प्रयत्न करणार असून मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्री ना. देवेन्द्र फडणवीस यांचेकडून मानधन वाढवूनच घेणार असल्याचे सांगीतले . याप्रसंगी संजय कडोळे यांच्या साप्ताहिक करंजमहात्म्य वृत्तपत्राचे त्यांनी प्रकाशन करून अवलोकन केले . प्रदिप वानखडे यांनी विदर्भ लोककलावंत संघटनेतर्फे आमदार ऍड. सरनाईक यांचे आभार मानले .