कारंजा (लाड):-
शनिवार दिनांक २७ मे २०२३ रोजी शासकीय विश्राम गृह कारंजा लाड, येथे आयोजित काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता बैठकीला मार्गदर्शन करताना जुनी पेन्शन योजना व पदवीधर सुशिक्षीत बेरोजगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन विभागीय पदवीधर मतदार संघाचे आमदार श्री. धिरजभाऊ लिंगाडे यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्री.दिलीपभाऊ भोजराज यांनी मार्गदर्शन करतांना संभाव्य नगर परिषद निवडणुकीच्या दृष्टीने आमदार धिरजभाऊ लिंगाडे यांच्या मार्गदर्शनात प्रभाग निहाय बैठीका घेऊन पक्ष संघटन मजबूत करून पक्षाला गत वैभव प्राप्त करून देण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. तसेच माजी नगराध्यक्ष श्री.अरविंदजी लाठिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमिर खान पठाण, कमलेशजी सपकाळ,संजयजी जयस्वाल,नितीनजी जाधव,उमेशजी शितोळे अल्पसंख्यांक विभाग शहर अध्यक्ष युसब जट्टावाले, सेवादल शहर अध्यक्ष ऍड. वैभव लाहोटी, सरपंचअरुण चव्हाण, प्रदीप राऊत, हिरामण पाटील, फैजल पठाण,अब्दुल राजिक, प्रफुल्ल गवई,अभिजित कोहर, ऋषिकेश आडे, रिजवान खान, फैजनोद्दीन, सोराप पठाण, अक्षय बनसोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
जुनी पेन्शन योजना संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. निलेश कानडे, विलास जलमकर, अजय चव्हाण, निशांत सरप, बदृद्दिन कामनवाले,संजय राठोड, सुनील गायकवाड, शिवसेनेचे गणेश बाबरे, गोपाल येवतकर, आदींनी उपस्थित राहून पदवीधर सुशिक्षीत कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्यात.
आमदार श्री धिरजभाऊ लिंगाडे यांनी सर्वांच्या समस्या ऐकून समजावून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी आपण जातीने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. संचलन विनोद मनवर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन ऍड संदेश जिंतुरकर यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....