कारंजा : कोव्हिड 19,कोरोना महामारी असो की,चिकनगुनिया असो.मुदती ताप असो की,दमा खोकला अतिसार असो.या सर्वच आजारा मधून डॉक्टर आपली निर्विघ्न सुटका करीत असतात. "माणसाची जेवढी श्रध्दा परमेश्वर,अल्लाह यांचेवर असते. तेवढीच श्रध्दा तेवढाच विश्वास डॉक्टरांवर असतो.आणि त्यामुळेच या विज्ञानयुगातील देवता म्हणजे डॉक्टर्स हेच आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
"कारंजा शहरातील तळागाळातील, खेड्यापाड्यांवरील,गोरगरीब, दिव्यांग रुग्नांची वेळप्रसंगी, रात्री बेरात्री निःशुल्क सेवा करणारे डॉक्टर्स म्हणजे गांधी चौकातील डॉ.संजय किटे आणि महात्मा फुले चौकातील समर क्लिनिक व हॉस्पिटल चे डॉ.मुजफ्फर खान आणि डॉ. आमिरखान. ही डॉक्टर मंडळी कारंजा शहरात व खेडोपाडीच्या तांडा वस्तीतील रुग्नामध्ये विश्वासाने ओळखली जातात. त्यामुळे डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून,स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा आणि साप्ताहिक करंजमहात्म्य परिवाराचे वतीने,त्यांचा पत्रकार,संजय कडोळे,पत्रकार उमेश अनासाने तसेच खेर्डा काळी चे माजी सरपंच प्रदिप वानखडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत डॉक्टर्स दिना निमित्त पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्यात.