कारंजा : सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाच्या निकालामुळे कारंजा शहरात सुद्धा आनंददायी प्रतिक्रिया उमटत असतांनाच, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेतर्फे या निकालावर सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असतांना ओबीसी समाजाचे युवा कार्यकर्ते सत्यजित उर्फ बंटीभाऊ गाडगे तथा समाजसेवीका सौ आशाताई गाडगे यांनी सर्वोच्च न्यायालय, बांठीया आयोग, महाराष्ट्र शासन तथा केन्द्रशासनाचे आभार मानतांना उशीरा का होईना ओबीसी समाजाला न्याय मिळाला असल्याचे सांगीतले यावेळी जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना दिलेल्या मुलाखतीत सत्यजित उर्फ बंटीभाऊ यांनी ओबीसी समाजाचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगतानाच पक्षाने जबाबदारी दिल्यास आपण नगर पालिका निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले .