अकोला:- राज्यातील सर्व अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व् उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित धोरणानुसार वाढीव अनुदानाचा पुढील टप्पा प्रचलित धोरणानुसार 1 जानेवारी 2024 पासून लागू करून त्याचा शासन आदेश वेतन वितरण सह काढावा व शासन निर्णय दि 12 ,15 व 24 फेब्रुवारी 2021 मधील त्रुटी पूर्तता करून अनुदानास पात्र ठरलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना समान टप्पा देऊन त्यांना सुद्धा प्रचलित नुसार अनुदान सूत्र लागू करावे तसेच पुणे स्तरावरील सर्व अघोषित शाळांना अनुदान सूत्र लागू करावे या मागणीसाठी दिनांक २२ जुलै 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे
यामध्ये साई जन्मभूमी पाथरी व धाराशिव या दोन ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झालेली आहे
व अकोला येथे सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली तरी
नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये माननीय शिक्षण मंत्री महोदय सभागृहामध्ये 01जून 2024 पासून वाढीव टप्पा लागू करण्यात येईल व त्याव त्यासंबंधीचीी तरतूद डिसेंबर 24 चा हिवाळी अधिवेशनातात करण्यात येईल असे निवेदन केले परंतु डिसेंबर 24 च्या आधी राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत
त्यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून तात्काळ वाढीव टप्प्याचा व त्रुटी पूर्तता केलेल्या पात्र शाळांचा शासन आदेश काढून त्यांना तात्काळ वेतन अनुदान देण्यात यावे अशा प्रकारचे मागणीसाठी सदर आंदोलने महाराष्ट्रभर सुरु करण्यात आलेले आहेत
आज अकोला येथील आंदोलनाच्या पहिल्या दिवशी विज्युक्टा संघटनेचे प्रांताध्यक्ष प्रा डॉ अविनाश बोर्डे सर
शिक्षण परिवर्तन आघाडीचे संस्थापक प्रा प्रकाश डवले सर ,शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष श्री दीपक बिडकर सर यांनी आजच्या आंदोलनाला भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला
यावेळी शिक्षक समन्वय संघाचे
प्रा संतोष वाघ, प्रा गणेश ढोरे, प्रा सदानंद बानेरकर, माध्यमिक संघटनेचे अध्यक्ष श्री बाळकृष्ण गावंडे सर,प्रा पियुष तिरूख, प्रा श्रीकांत पळसकार, प्रा विजय थोटांगे, प्रा बंडू चक्रणारायण, प्रा नवघरे सर, प्रा तौसीफ सर,
प्रा कु इंदिरा राऊत ताई, प्रा कु श्वेता तायडे मॅम,प्रा वैद्य सर, प्रा माधव बावनेर, प्रा विद्याधर पाटील सर, यांचेसह अकोला जिल्ह्यातील शेकडो शिक्षक व शिक्षिका आंदोलन स्थळी उपस्थित होते
बेमुदत असलेल्या या आंदोलनात जास्तीत जास्त शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समन्वय संघाच्या वतीने करण्यात आले आहे
आपल्या प्रतिक्रिया द्या....