कारंजा (लाड) : सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र शासनाकडून, वैदर्भिय भूमितील,सप्तखंजेरी समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज चिंचोलीकर यांच्या जिवन कार्याची कोणतीही दखल न घेता,"महाराष्ट्र भूषण" पुरस्कारापासून त्यांना वेळोवेळी डावलून सच्च्या समाजप्रबोधनकार समाजसेवकावर अन्याय केल्यामुळे,कारंजा येथील लोककलावंत व समाजसेवकांनी एकत्र येत,गुरुवार दि.01 फेब्रुवारी 2024 रोजी तहसिल कार्यालयावर आपला जाहीर निषेध व्यक्त केला.आणि तहसिलदार कारंजा यांचे मार्फत ,"लवकरात लवकर गुरुवर्य सत्यपाल महाराज यांना "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार देण्याची मागणी रेटून धरली." याबाबत सविस्तर वृत्त असे की, "गेल्या पन्नास पंचावन्न वर्षापासून विदर्भाच्या मातीतील,अकोला जिल्हयाच्या ग्रामिण भागातील सिरसोली ह्या गावखेड्यात राहणाऱ्या सत्यपाल महाराज यांनी गुरुदेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या विचार सरणीने प्रभावीत होऊन तसेच शाहू फुले आंबेडकर यांच्या आदर्शाने,गेल्या पन्नास वर्षापासून,महाराष्ट्र राज्यात व राज्याबाहेर देखील हजारो गावखेड्यामध्ये आपल्या सप्तखंजेरी प्रबोधन किर्तनाने, अंधश्रद्धा,हुंडाप्रथा निर्मूलन,व्यसनमुक्ती,बेटी बचाओ बेटी पढाओ,शेतकरी समस्या इत्यादी राष्ट्रिय कार्यक्रमावर लोकजागर करीत प्रचार प्रसार केला.शिवाय जनजागृती करणारे,सप्तखंजेरी प्रबोधनाचे प्रशिक्षण आपल्या हजारो शिष्यांना देऊन त्यांच्या द्वारे गुरुदेवाची ग्रामगीता घराघरात-मना-मनात पोहचविणाऱ्या,तळागाळातील विदर्भाच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या सत्यपाल महाराज चिंचोलीकर या वऱ्हाडी ग्रामिण लोकांच्या हृदयपटलावर अधिराज्य करणाऱ्या, तळागाळातील लोककलावंताला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या जीवन कार्याचा गौरव करण्याची मागणी सर्वसामान्यांनी रेटून धरली होती.परंतु धनदांडग्याचे आणि उच्चवर्णियांचे चोसले पुरविणाऱ्या मायबाप सरकारने सच्च्चा लोकककलावंत समाजसेवकांच्या न्याय्यहक्काचा "महाराष्ट्र भूषण पुरस्कार" अखेर दिग्गज चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांना जाहिर केला त्यामुळे शासनाच्या या निर्णयाने तळागाळातील लोककलावंतामध्ये असंतोष पसरला असून,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा (लाड)कडून गुरुवार दि.01 फेब्रुवारी 2024 रोजी कारंजा तहसिल कार्यालय येथे निवेदन देऊन राज्यशासनाच्या अन्याय्य निर्णयाचा जाहिर निषेध करण्यात आला. तसेच सत्यपाल महाराज चिंचोलीकर यांना महाराष्ट्र भूषण देण्याची मागणी करण्यात आली.यावेळी कारंजा येथील विविध संघटनाचे पदाधिकारी, समाजसेवक,पत्रकारांची लक्षणिय उपस्थिती होती.यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे व असंख्य लोककलाकार,गुरुदेव सेवा मंडळाचे गजाननराव अमदाबादकर,संतोष केळकर, विजय खंडार,दामोदर जोंधळेकर,तुकाराम गजभार, उमेश अनासाने,ज्ञानेश्वर खंडारे, महादेवराव ठोंबरे, विनायक पद्मगिलवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष हाजी रऊफ खान, शाहीर देवमण मोरे, शेषराव इंगोले, श्रीकांत मोडक, कैलास हांडे, विजय निलख,अभा मराठी नाटय परिषदेचे समन्वयक अश्विन जगताप,चित्रपट दिग्दर्शक गोवर्धन कृपलानी, डॉ.गजानन गावंडे इत्यादीची उपस्थिती होती.
आपल्या प्रतिक्रिया द्या....