कारंजा : (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) स्थानिक कारंजा(लाड)शहरात कायम कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीशजी पांडे व कारंजा (लाड)शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक आधारसिंग सोनोने सतत प्रयत्नशील असतात.आणि त्यातुनच कारंजेकरां करिता शहर पोलिस स्टेशनच्या वतीने नवनविन उपक्रम राबविण्यात येतात.अश्यातच दि. 09 जुन रोजी शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून शहर पोलिस स्टेशनच्या वतीने शांतता रुट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. हा रुट नेहरू चौकात आल्यानंतर रैपिड ॲक्शन फोसॅचे अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे व पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने इ पोलिस अधिकाऱ्यांचे शांतता कमिटीचे सदस्य अँड संदेश जैन जिंतुरकर, गणेशभाऊ बाबरे व कपिल महाजन, तसेच बजरंग पेठेतील श्री संतगाडगे पुतळा जवळ शांतता समितीचे सर्व पदाधिकारी नगरसेवक प्रसन्ना पळसकर जाकीर शेख, नगीना मस्जीद ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व मौलवी , श्री संत गाडगेबाबा विचार मंच अध्यक्ष संतोष धोंडगे, बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष मंगेश कडेल इत्यादी प्रतिष्ठित मंडळींनी पोलीस कर्मचारी पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. रूट मार्च मधून पोलिस विभागाकडून कायदा अबाधित राखण्याचा व शांततेचा संदेश देण्यात आला असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे दिले आहे.