कारंजा : लोकशाहीमध्ये पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानल्या जातो.पत्रकार हा समाज आणि शासनाला जोडणारा महत्वाचा दुवा असतो.एखाद्या दगडाला शेंदूर फासून त्याच्यामधील देवत्व सिद्ध करण्याची किमया म्हणजेच सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेता बनविण्याची आणि नेत्याला खासदार आमदार अर्थात सत्ताधिश करण्याची कला ही केवळ पत्रकारांमध्येच असते.पत्रकार हा स्वतंत्र असतो.तो स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आणि शिरावर मृत्युची टांगती तलवार घेऊन,केवळ जनतेचा सर्वांगीन विकास होऊन जनतेला त्यांचे न्याय्य हक्क मिळावे.यासाठी संपूर्ण आयुष्यभर पत्रकार हा शासनाशी झगडत असतो.त्याचा पत्रकारीता हा व्यवसाय नसून ती निव्वळ समाजाची सेवा आणि त्याच्या मधील समाजाप्रती कर्तव्य भावना असते. मात्र याची जाणीव प्रत्यक्ष सत्ताधिश म्हणजेच शासन तर ठेवतच नाहीत.परंतु ज्यांना पत्रकारांनी सामान्य कार्यकर्त्यापासून नेता किंवा उमेद्वार बनवीण्यासाठी समाजामध्ये प्रसिद्धी मिळवून दिली.असे नेते किंवा उमेद्वार देखील स्थानिक पत्रकारांची जाणीव ठेवत नसल्याचे पाहून मनाला भयंकर वेदना होत असल्याचे दुःख महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी व्यक्त केले आहे. सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचा हंगाम सुरु आहे. परंतु अशावेळी कारंजा शहरामध्ये विविध उमेद्वारांकडून स्थानिक पत्रकारांना विश्वासात घेता,सरसकट स्थानिक पत्रकारांना डावलून,कारंजा तालुक्याबाहेरचे असणाऱ्या आणि वाशिम-यवतमाळ-अकोला व इतर जिल्ह्यांतील निवडक पत्रकारांना जाहिराती देवून बाहेरच्या पत्रकारांचे चोसले उमेद्वाराकडून पुरवील्या जात आहेत.कारंजा शहर व तालुक्यातील स्थानिक पत्रकारांना विविध राजकिय पक्ष आणि उमेद्वारांकडून जाहिराती पासून वंचित ठेवण्यात येत असल्याचे वास्तव असून याचे परिणाम,पुढच्या काळात विविध राजकिय पक्ष आणि उमेद्वारांना निश्चितच भोगावे लागणार असल्याचा निर्वाणीचा इशारा, ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी संबाधिताकरीता दिला आहे.