आरमोरी :- राजमाता मासाहेब जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्वामी विवेकानंद या महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त महिला सशक्तीकरणाच्या उद्देशाने आरमोरी शहरात दिनांक ५ जाणे. २०२५ रोज रविवार ला ८:०० सकाळी वाजता रन फॉर नारीशक्ती मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन गोटूल भूमी वडसा रोड, आरमोरी येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.रामदासजी मसराम साहेब तर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ऍड.मा.श्रुतीताई बोरकर मॅडम तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार रामकृष्णजी मडावी साहेब , डॉ.नीलकंठ मसराम, प्रकाश पंदरे सर, मनीषाताई दोणाडकर , चारुदत्त राऊत सर, राजूजी घाटूरकर सर, प्रीतीताई भोयर , रमेशजी मने , शुभांगीताई गराडे, के. टी. किरणापुरे सर, गंगाधरजी जुआरे सर , रिंकूभाऊ झरकर, डॉ. चिखराम साहेब , मिलिंद खोब्रागडे उपस्थित होते याप्रसंगी समाजातील महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी मागील ६ वर्षापासून ३ हजार मुली व महिलांना निस्वार्थपणे निशुल्क कराटे प्रशिक्षण देणारे कराटे प्रशिक्षक राजुजी घाटूकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समितीची स्थापना करून ७ हजार रुग्णांना रक्तपुरवठा करणारे चारुदत राऊत व सागर वाढई यांचा सत्कार करण्यात तसेच वडसा येथील तुलसी विजय मेश्राम या विद्यार्थिनीने गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत अथलेटिक्स मधील लांब उडी व रनिंग या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट प्रदर्शन केल्याबद्दल तिचा सुद्धा शाल व श्रीफळ देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला रन फॉर नारीशक्ती मॅरेथॉन स्पर्धा तीन गटात आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये "अ"गट महिलांचा ५ किमी दौड खुला गट यामध्ये प्रथम क्रमांक भाग्यश्री लेनगुरे, द्वितीय डिंपल लक्षणे तर तृतीय क्रमांक उज्वला मने, चतुर्थ क्रमांक ओझल भैसारे,पाचवा क्रमांक स्नेहल झोडे, सहावा क्रमांक संगीता माटे यांनी पटकावला तर "ब"गटात १४ वर्षाआतील मुलींची ३ किमी. दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक संगवी कापकर ,द्वितीय मानसी फटिंग, तृतीय हार्दिकि मने ,चतुर्थ श्वेता पिल्लारे , पाचवा क्रमांक स्नेहल फटिंग तर सहावा क्रमांक रियल लांबट यांनी पटकावला "क"गटात ३० वर्षावरील महिलांच्या तीव्र चालण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रतिभा मनोज बोरकर ,द्वितीय क्रमांक माया संजय रंदये ,तृतीय क्रमांक प्रतिभा रवींद्र सपाटे, चतुर्थ क्रमांक छाया चेतन भोयर ,पाचवा क्रमांक अश्विनी होमराज फटिंग , सहावा क्रमांक गीतांजली चंद्रशेखर वाटगुरे , सातवा क्रमांक रूपाली घनश्याम वनवे , आठवा क्रमांक सविता शशिकांत राऊत, नववा क्रमांक हंसा विजय नैताम तर दहावा क्रमांक प्रणाली सचिन भोयर यांनी पटकावला तर सर्व आरमोरीकरांचे विशेष लक्ष वेधणाऱ्या सौ विंनता गंगाधर कानतोडे वय ७८ वर्ष व सौ.शोभा दादाजी भोयर वय ७२ वर्ष यांनी ३ किमी. तीव्र चालण्याच्या स्पर्धेत उत्कृष्ट व अप्रतिम प्रदर्शन दाखवून म्हातारपणाच्या वयात सुद्धा शरीर तंदुरुस्त व निरोगी ठेवण्याचा मंत्रच दिला सर्वांना विजेत्यांना रोख रक्कम , मेडल्स, ट्रॉफी देऊन सन्मान सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे संचालन राहुल जुआरे प्रास्ताविक चारुदत्त राऊत तर आभार सहारे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेत्यासाठी देवानंद दूमाने , दिलीप हाडगे , विलास गोंदोळे, महेंद्र मने , विजय मुळे,मनोज गेडाम ,पंकज इंदुरकर, लीलाधर मेश्राम , सुमित खेडकर, रोहित बावनकर ,सुरेश मेश्राम ,सारंग जांभुळे , गौरव करंबे,प्रिन्स सोमणकर,जान्हवी बडवाईक, दीक्षा तिजारे, रुचिता नैताम ,सचिन वाटगुरे
चारुलता तिजारे, सुरज नारनवरे ,प्रतीक निमजे ,श्रेया शेबे ,शाम सावसाकड़े ,कृष्णा बोरकर,समीर कांबळे ,गौरव शेंडे ,साहिल टिंगुसले यांनी सहकार्य केले.