चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांच्या प्रेरणेने तसेच जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था चंद्रपूर, प्राचार्य श्री. धनंजय चाफले, जेष्ठ अधिव्याख्याता मा. श्री. हिवारे, वरिष्ठ अधिव्याख्याता व क्षेत्रिय अधिकारी नागभीड मा. श्री. विनोदजी लवांडे यांच्या सौजन्याने व पंचायत समिती नागभीड चे गटशिक्षणाधिकारी मा. अरविंद चिलबूले यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १८ मे पासून दिव्यांग विद्यार्थ्यांकरीता, अध्ययनात मागे असलेल्या व शाळापूर्व तयारी ची गरज असलेल्या विद्यार्थ्यां करीता समग्र शिक्षा, समावेशित शिक्षणा अंर्तगत उन्हाळी विशेष वर्गाचे/शिबिराचे आयोजन जि. प. प्रा. बेसिक शाळा (मुलांची) नागभीड येथे करण्यात आले असून सदर उन्हाळी वर्गाला दिनांक १९ मे ला शाळा व्यवस्थापन समितीच्या चमूने आकस्मिक भेट दिली.
यात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. श्री.अरूण जी भोळे व इतर सदस्य मा. श्री.नत्थूजी येसनसूरे, मा. सपना खोब्रागडे तसेच मा. प्रीती डोंगरे , शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भाकरे, माजी शिक्षिका सौ. झाडे जि. प.शाळा पुलगाव, सौ. छाया साखरकर जि. प. शाळा कोर्धा यांनी विशेष वर्गाला भेट दिली. व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर शिबिराचे आयोजन समावेशित शिक्षण तज्ञ कु. छाया रामाजी विंचूरकर यांनी केले असून सदर शिबिराला उपस्थित मान्यवरांचे स्वागत व आभार व्यक्त करण्यात आले. सदर शिबिरा करीता नागभीड केंद्राच्या विशेष शिक्षिका सौ. प्रेमा अंबादे व स्वयंसेवक हर्ष गेडाम उपस्थित होते.