कारंजा - केंद्रीय सामाजीक न्यायराज्यमंत्री ना. रामदास आठवले, सेवानिवृत्त मुंबई पोलीस उपायुक्त साहेबराव सुरवाडे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सतिश केदारी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष अॅड. एस.टी. सावंत व महाराष्ट्र अध्यक्ष मुकुंद ओव्हळ यांच्या आदेशानुसार येथील जेष्ठ कलावंत शेषराव मेश्राम यांनी केंद्रीय मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या कला व मनोरंजन विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यासंदर्भातील निवडपत्र मेश्राम यांना ११ एप्रिल रोजी प्राप्त झाले. शेषराव मेश्राम हे परिवर्तन कला महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी कार्यरत आहेत. "संघटनेने दिलेल्या जबाबदारीच्या माध्यमातून आपण कवी,गायक, शाहीर, संगीतकार यांच्या हक्कासाठी प्रयत्न करणार असून लवकरच जिल्ह्यात भव्य कलावंत मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल."अशी ग्वाही मेश्राम यांनी यावेळी दिली. शेषराव मेश्राम यांच्या निवडीबद्दल कारंजा शहरात आनंदाचे वातावरण असून, स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे, उमेश अनासाने, विजय पाटील खंडार, राजुभाऊ सोनोने, ओंकार मलवळकर, अजाबराव ढळे, नंदकिशोर कव्हळकर, पांडूरंग माने, मोहित जोहरापूरकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे . तसेच त्यांच्या नियुक्तीमुळे कलावंताना त्यांचे न्याय्य हक्क मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे .