चंद्रपूर: पिपरी येथील निलंबीत गट सचिव ए.बी. मालोदे यांनी शेतकऱ्यांच्या पिक कर्जाच्या रक्कमेची उचल करून अफरा-तफर केली. त्याच्यावर अद्यापही कारवाई करण्यात आली नाही. पीक कर्जाचे रक्कम वसूल करून मालोदे वर कारवाई करावी अशी मागणी पिपरी सेवा सह. संस्थेने केली आहे.
ए . बी. मालोडे (निलबीत गटसचिव) मौजा पिपरी येथील पिपरी सेवा सहकारी संस्थेच्या सभासद शेतकन्यांच्या पिक कर्जाच्या रक्कमेची आपले रेकॉर्डला भरणा केल्याचे न दाखवता त्यांनी स्वतः बनावटी पावती बुक छापून शेतकऱ्यांनी पिक कर्जाची रक्कम भरण्यासाठी दिली असता त्यांनी स्वतः छापलेली पावती शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कर्ज खात्यामध्ये कर्ज बाकी दाखवित असून याबाबत वारंवार सूचना देऊन सुध्दा निलंबीत सचिवावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही आजपावेतो झालेली नाही. तसेच पिक कर्जाची रक्कम ३१ मार्च २०२३ पर्यंत भरणे असल्यामुळे निलंबीत सचिवाकडून वसूल करून ती रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना पिक कर्जाच्या खात्यात भरणा करण्यात यावी अशी मागणी सचिन राजूरकर महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ ,पिपरी सेवा सहकारी संस्था चे अध्यक्ष गणेश आवारी, उपाध्यक्ष अतुल भैय्याजी मोहितकर,संचालक बंडू मडावी, रामभाऊ ताटे,ईश्वर उपरे,अतुल पाचाभाई या शेतकऱ्यांनी यांनी उपनिबंधक यांच्याकडे केली आहे. अन्यथा कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे