वाशिम : सत्य,अहिंसा,न्याय व विश्वासाने जग जिंकायचे. समाजाला दारिद्रय, अंधश्रद्धा, व्यसनाधिनतेतून बाहेर काढून, अशिक्षीतता,बेरोजगारी पासून मुक्ती मिळवून खऱ्या अर्थाने स्वातंत्र मिळवायचे.या ध्येयाने साहित्य-कला-पत्रकारिता आणि संस्कृती करीता,संत गाडगे महाराज स्वच्छता दूत राष्ट्रीय पुरस्कार,राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार,आदर्श समाजसेवक पुरस्कार प्राप्त संजय कडोळे यांनी लोककलेतून जनजागृती सुरु केलेली असून, आपल्या लोककलेच्या कार्यक्रमा मधून ते व त्यांचे सहकारी प्रदिप वानखडे, शेषराव इंगोले, देवका इंगाले, इंदिरा मात्रे, कांता लोखंडे, लोमेश चौधरी, गोपाल मुदगल, कैलास हांडे इत्यादी लोककलावंत मनोरंजनासोबत उद्बोधन समाजप्रबोधन करूनसमाजाला देशभक्तीचे धडे देऊन सशक्त राष्ट्रनिर्मानाची मोहीम राबवीत आहेत. जिल्ह्यातील विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा या संस्थेने ही जनजागृती मोहीम यशस्वीपणे सुरू केली आहे.