वाशिम : पूर्वी एखादे हॅन्डबिल किंवा पॉम्प्लेटवर (प्रसिद्धीपत्रकावर) सर्वात वर आवर्जून लिहीलेले असायचे, "आपण वाचा . ! दुसऱ्याला सांगा . .!!" अगदी त्याच पद्धतीने यावेळी प्रत्येक आजी-माजी सरपंच,पोलीस पाटील,ग्रामपंचायत सदस्य,आजी-माजी नगरसेवक, शिक्षक,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर,शिक्षक,विद्यार्थी आणि प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी आपल्या शेजारी,गावात राहणाऱ्या प्रत्येक वयोवृद्ध,निराधार,विकलांग, दुर्धरआजारग्रस्त,विधवा व परित्यक्त्या महिलांना, "तुमच्या तालुक्याच्या तहसिल कार्यालयातील संजय गांधी योजनेच्या विभागात,निराधार अनुदान योजनेचा लाभ भविष्यात तहहयात कायमचा मिळत रहावा.यासाठी जास्तित लवकर म्हणजे आजच 1) आधारकार्ड झेरॉक्स 2) संपर्काकरीता स्वतःचा मोबाईल नंबर आणि 3) बँक खाते क्रमांक नेऊन द्यायला जरूर सांगा." कारण यापुढे महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालय, "लाभार्थ्यांना थेट अनुदान हस्तांतरण योजनेंतर्गत महा. आय.टी. विकासात्मक संस्था (डि.बी.टी.) मध्ये लाभार्थी निराधाराची आधारकार्ड मोबाईल नंबरसह नोंदणी प्रक्रिया करून, लाभार्थ्यांना सरळप्रक्रियेद्वारे निराधाराचे खात्यात जलद गतीने दरमहा अविलंब थेट लाभ देणार आहे." त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याची खाती आधारकार्ड मोबाईल क्रमांक घेऊन प्रमाणिकरण करण्यात येत असून तहसिल कार्यालयामार्फत निराधाराची खाती अद्यावत करण्यात येत आहेत.लक्षात घ्या आधारकार्ड न दिल्यामुळे ज्यांची खाती आज रोजी अद्यावत झाली नाही. तर त्यांना भविष्यात लाभापासून वंचित रहावे लागणार आहे.महत्वाचे म्हणजे बरीच निराधार किंवा वयोवृद्ध मंडळी वृत्तपत्रे वाचत नाहीत.किंवा अनेकांकडे मोबाईल देखील नसतात.त्यामुळे आज रोजी तहसिल कार्यालयात आपल्याला आधारकार्ड द्यावे लागते.हे त्यांना माहितीच होत नाही.त्यामुळे "आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो" या कर्तव्य भावनेने प्रत्येक नागरिकांनी शेजारच्या संजय गांधी किंवा श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थी वयोवृद्ध निराधारांना ही माहिती द्यावी. व मानवसेवा करावी.असे,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी आवाहन केले आहे.