चिमुरला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करणाऱ्या राज्य सरकार विरोधात .त्यांच्या निर्णयाची होळी करून निषेध करण्यात आला व SDO मार्फत मुख्यमंत्री व उपमुखयमंत्री यांना निवेदन देऊन ब्रम्हपुरी येथेच अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.अन्यथा 3 जुलै रोजी ब्रम्हपुरी बंद व विशाल धरणे आंदोलन करण्याचा .ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीचा इशारा!
ब्रम्हपुरी :-- कालच्या वृतपत्रांत व विविध चॅनल (मीडिया) मध्ये चिमूरला... अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय..मंजूर करण्यास मंत्री मंडळांनी निर्णय घेऊन त्या मध्ये सिंदेवाही, नागभिड व ब्रम्हपुरी तालुका समाविष्ट केल्याची बातमी आली .ही बाब ब्रम्हपुरीकरांसाठी अन्यायकारक आहे.
याकरिता आज सकाळी गेस्ट हाऊस येथे मा. प्रा.सुभाष बजाज यांच्या अध्यक्षतेखाली ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समिती ची तातडीची सभा घेण्यात आली.व या संदर्भात निषेध व शासनाला निवेदन द्यायचं ठरल .
त्या अनुषंगाने तहसील कार्यालय च्या गेटपाशी सकाळी 11 वाजता त्या निर्णयाची होळी करून सरकार विरोधात तीव्र नारेबाजी करून संताप व्यक्त करण्यात आला . व अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय ब्रम्हपुरीलाच देण्यात यावे या मागणीसाठी मान . मुख्यमंत्री व मान उपमुख्यमंत्री यांना मान. उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास 2019 मध्ये मंजुरी देण्यात आली होती.परंतु दि 3 फेब्रुवारी 2021 ला जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी 15 दिवसाच्या आत आक्षेप अर्ज मागविले होते तेव्हा ब्रम्हपुरी, नाग भीड, शिंदेवाही येथील यांनी आक्षेप नोंदवत SDO मार्फत हजारो हरकती सादर केल्या होत्या तेव्हा या सर्व हरकतीचा विचार करून जिल्हाधिकारी यांनी चिमूर येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय 28 ऑगस्ट 2021रोजी आदेश काढून ब्रम्हपुरी येथे स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला होता .हा निर्णय रद्द करण्याच्या विरोधात चिमूर येथील काही नागरिक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती.या प्रकरणी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली होती व त्या संबंधाने न्यायालयात उत्तर सादर करण्याचे बजावले होते.
परंतु राज्य सरकारने या बाबतीत आपला उत्तर न्यायालयात सादर न करता व कोर्टात केस प्रलंबित असताना सुद्धा दिनांक 13 जून 2023 रोजी मंत्रिमडळात चुकीच्या पद्धतीने निर्णय घेऊन चंद्रपूर जिल्हयातील चिमूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे, हा निर्णय रद्द करून 1910 पासून अस्तित्वात असलेल्या 110 वर्ष जुन्या व सर्व सोहिसुविधा उपलब्ध असलेल्या ब्रम्हपुरी येथेच अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्याची मागणी केली आहे. या मागणीचा सकारात्मक विचार न केल्यास येत्या 3 जुलै रोजी ब्रम्हपुरी कडकडीत बंद व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विशाल धरणे आंदोलन करण्याचा व नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्याचा इशारा ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीचे निमंत्रक विनोद झोडगे,सूरज शेंडे,अविनाश राऊत , प्रा.सुभाष बजाज,राजू भागवत, हरीचंद्र चोले,सुधाकर पोपटे,दीपक नवघडे,दत्तू टिकले,तुळशीदास गेडे,महेंद्र बाविस्कर,सुखदेव प्रधान ,सुधीर सेलोकर,यादव रावेकर, कमर अल्ली सयद, रईस खान पठाण, सुबध शेंडे,प्रणय कोहपरे,अमित कनाके,साकेत भाणारकर, तनय देशकर, नरू नरड यांनी केले आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....