अकोला- आज राष्ट्रीय पातळीवर नेत्रदान व अवयव दानाच्या संदर्भात जनजागरणाची गरज असून ही गरज लक्षात घेता नेत्रदान व अवयव दाना संदर्भात समाजाची मानसिकता बदलण्याची खरी गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्य मंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी केले. राज्याचे माजी सहकार मंत्री तथा शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, लोकनेते स्व वसंतरावजी धोत्रे यांच्या सहाव्या पुण्यस्मरण निमित्त लोकनेते वसंतरावजी धोत्रे स्मृति प्रतिष्ठानच्या वतीने तथा शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, इंडियन रेड क्रॉस सोसायटी अकोला, इंडियन सोशल अँड रिसर्च फाउंडेशन यांच्या सहकार्याने स्थानीय कृषि उत्पन्न बाजार समिती प्रांगणात अवयवदान जनजागृती सोहळा,निबंध व पोस्टर स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख सोहळ्याचे उद्घाटक म्हणून ना.जाधव मार्गदर्शन करीत होते.श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेत संपन्न या सोहळ्यात मंचावर वारकरी संप्रदायाचे हभप तुकाराम महाराज सखारामपुरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गजाननराव पुंडकर, दिलीपराव इंगोले, शा.वै. महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्यशिक्षक डॉ तरंग तुषार वारे, डॉ सुभाष कोरपे, डॉ रणजीत सपकाळ, हेमंत काळमेघ, कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार, जिल्हा उपनिबंधक डॉ प्रवीण लोखंडे, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य रामेश्वर भिसे,मुख्य संयोजक संदीप पुंडकर,संयोजक चंद्रशेखर खेडकर,प्रभजित सिह बछेर, डॉ किशोर मालोकार, डॉ. चंद्रकांत पनपालिया आदी मान्यवर उपस्थित होते. लोकनेते स्व वसंतराव धोत्रे यांच्या पुतळ्यात ना. जाधव यांच्या हरार्पणने या सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. ना.जाधव पुढे म्हणाले ज्या पद्धतीने नेत्रदानात हा जिल्हा राष्ट्रीय पातळीवर अग्रेसर असून अवयव दानाताई हा जिल्हा पुढे जावा यासंदर्भात आयोजकांनी 200 नागरिकांना मरणोत्तर देताना साठी संकल्पित केले ही मोठी अभिमानाची बाब आहे मात्र या संदर्भात ताकदीने जनजागरणाची अत्याची गरज असून ही गरज लक्षात घेता आपणही देदनाचा संकल्प घेतला असल्याचे यावेळी सांगून या उपक्रमाचे प्रशंसा केली. या सोहळ्याचे संयोजक संदीप फुंडकर यांनी प्रास्ताविक करीत या आगळावेगळा लोकोपयोगी उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमात हभप तुकाराम महाराज सखारामपुरकर यांचा ना जाधव यांनी सन्मानपत्र देऊन गौरव केला. सन्मानपत्र वाचन एड अनंत खेळकर यांनी केले. यावेळी हभप तुकाराम महाराज यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत वारकरी संप्रदायाने अवयवदानचे महत्व समाजाला पटवून देण्याचे आवाहन केले. स्वागतपर मनोगत लोकनेते स्व वसंतराव धोत्रे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांनी व्यक्त केले.नेत्रदान व देहदानदात्याचा सन्मान समाजात होऊन या संदर्भात जनजागरण झाले पाहिजे यासाठी बाजार समितीने ही या सेवाभावी कार्यात पुढाकार घेऊन जनजागरणाची महती सिद्ध केली असल्याचे सांगितले. या सोहळ्यात आयोजन समितीच्या वतीने ना. जाधव यांचा भावपूर्ण गौरव करण्यात येऊन त्यांना सन्मानपत्र बहाल करण्यात आले. तर जाधव यांच्या हस्ते सर्व मान्यवरांना स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ तरंग तुषार वारे यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत समाजासाठी मरणोत्तर नेत्रदान व देहदान अत्यंत आवश्यक असल्याचे सांगून उपस्थितांना अवयवदानची सामूहिक शपथ दिली. दरम्यान या सोहळ्याचा प्रारंभ महानगरातील बहुसंख्य शाळा,महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनेक घोषवाक्यांच्या समवेत नेत्रदान व देहदान संदर्भात परिसरात भव्य दिंडीने करण्यात आला.ही दिंडी शिवाजी महाविद्यालयातुन भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आला. या दिंडीत बहुसंख्य शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संघटना,संस्था,शिक्षक वृंदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत यात सहभाग घेतला.

मान्यवरांच्या उद्बोधन नंतर देहदान, नेत्रदान व अवयवदान केलेल्या दानदातांच्या कुटुंबीयांचा ना जाधव यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी मंचावर जाऊन अनेक कुटुंबियांनी जाधव यांच्याकडून कृतज्ञता पत्र स्वीकारले. कार्यक्रमात समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या अवयव दान ,नेत्रदानावर आधारित पोस्टर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा ही यावेळी संपन्न झाला.यामध्ये अनुष्का म्हैसने प्रथम,अंजली घुमरे द्वितीय तथा अर्पिता आगरकर ही तृतीय आली. उत्तेजनार्थ पारितोषिक शंतनु कस्तुरकार,निकिता गंगाधरे, तर ब गटातील गायत्री बेलपत्रे, विपश्यना गोपनारायण, योगेश शेवलकर, पृथ्वीका बढे, तेजल ठोंबरे, आदिती ढोरे, हंसिका पेढीवाल,सृष्टी फुलझरे आदींना ना जाधव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी पोस्टर स्पर्धेतील उत्कृष्ट पोस्टर्सचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.संचालन व आभार डॉ आशिष राऊत यांनी केले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती ज्ञानेश्वर महल्ले, संचालक अभिमन्यू वक्ते, राजेश बेले, विकास पागृत, मुकेश मुरूमकर,सचिन वाकोडे, रामेश्वर वाघमारे, दिनकर नागे,दिनकर वाघ ,सौ शालूताई चतरकर, सौ माधुरी परनाटे, भरत काळमेघ,संजय गावंडे, वैभव माहोरे,चंदू चौधरी,राजीव शर्मा,बाजार समितीचे सचिव सुनील मालोकार समवेत श्री शिवाजी शिक्षण संस्था, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा आरोग्य सेवा,इंडियन सोशल अँड रिसर्च फाऊंडेशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, निमा,बिजीई बेरार एज्युकेशन सोसायटी, विदर्भ इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असो. मुख्याध्यापक महामंडळ, म. रा. कलाध्यापक संघ, केंद्रीय होमिओपॅथी समिती,हिम्पा,जीपीए, राष्ट्रीय वैद्यक प्रसारक मंडळ, प्राचार्य फोरम, होमिओपॅथिक एज्युकेशन सोसायटी, मुख्याध्यापक संघ, श्री समर्थ शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ, महात्मा फुले इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, महर्षी वाल्मिकी नर्सिंग स्कूल, नॅशनल नर्सिंग स्कूल, माँ अनुसया नर्सिंग स्कूल, राधिका नर्सिंग स्कूल, एंजेल ऑफ मर्सी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स, स्व. पांडुरंग पाटील नर्सिंग कॉलेज, मानव स्कूल ऑफ इंजिनियरिंग, जिल्हा मजूर फेडरेशनचे पदाधिकारी, विद्यार्थी व ग्रामीण व शहरी परिसरातील दानदाते,अडते,व्यापारी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
आपल्या प्रतिक्रिया द्या....