अकोला :-आज रक्षाबंधनाचे औचित्य साधून अकोट मतदार संघातील तेल्हारा तालुक्यातील गाव धोंडा आखर हे गाव सातपुड्याच्या पायथ्याशी आदिवासी बहुलगाव असून येथे एक हजार आदिवासी महिला भगिनींसोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेवून 1000 भगिनींना साडी वाटप करण्यात आले. शिवसेना उपनेते तथा संपर्कप्रमुख अकोला जिल्हा मा. आ.गोपीकिशनजी बाजोरिया साहेब यांच्या नेतृत्वात त्यांच्या पुढाकाराने उपरोक्त कार्यक्रम घेण्यात आला..
या वेळी हिंगोली परभणी आ. विप्लवभैय्या बाजोरिया, अकोला जिल्हा शिवसेनाप्रमुख श्रीरंग दादा पिंजरकर, शिवसेना महिला आघाडी प्रमुख उषाताई विरक, शिवसेना प्रसिद्ध प्रमुख गोपाल नागपूरे सह शिवसेना व युवा सेना चे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...