पवनी ते लाखांदूर रोडवरील सावरबांधे यांच्या आसगाव येथील राई मिलजवळ अज्ञात वाहनाची धडक बसून मोटारसायकल स्वार युवक जागीच ठार झाला, तर सोबत असलेला मित्र जखमी झाल्यामुळे त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लाखांदूर तालुक्यातील चिचाळ (बारव्हा) येथील साहिल सुरेश रंगारी (२२) हा त्याचा मित्र नरेंद्र निनावे (२१) याच्यासोबत लाखांदूरकडून पवनीकडे दुचाकीने येत असताना विरुद्ध दिशेने येत असलेल्या अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोरात धडक दिली. यात साहिल रंगारी जागीच ठार झाला तर त्याचा मित्र नरेंद्र जखमी झाला.