आपकी बार किसान सरकार ही घोषणा देत ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रामध्ये भारत राष्ट्र समितीचा प्रचार आणि सभासद नोंदणी मोहीम गेल्या आठ ते दहा दिवसापासून सुरू आहे या मोहिमेअंतर्गत ब्रह्मपुरी तहसील मधील जवळजवळ 70 टक्के गावांमध्ये प्रचार आणि सभासद नोंदणी कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना 24 तास मोफत प्रकल्पातून मोफत व सतत पुरवठा होणारे पाणी अनुसूचित जातींच्या लोकांसाठी व्यवसायासाठी दहा लाख रुपयाचा अनुदान विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सरकारकडून मदत शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाचा योग्य दर निर्धारित करून ते खरेदी करणे व शेतकऱ्यास प्रतिवर्षी एक एकर जमिनीसाठी दहा हजार रुपये मदत करणे अशा प्रकारे तेलंगाना पॅटर्न त्यांनी राबवलेला आहे
त्यांच्या हाती सत्ता येऊन काही काळच झालेला आहे पण त्याने तेलंगाना व तिथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती बदललेली आहे पण महाराष्ट्रात चित्र मात्र उलट आहे हेच चित्र बदलविण्यासाठी महाराष्ट्रात भारत राष्ट्र समितीची सत्ता यावी यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत आणि 22 मे ते 22 जून या कालावधीत महाराष्ट्रातील 288 विधानसभा क्षेत्रामध्ये प्रचार आणि सभासद म्हणून सुरू आहे
याचाच एक भाग म्हणून ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रामध्ये विभागीय समन्वयक श्री ज्ञानेश वाकुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक श्री देवनंदन ठेंगरी, सौ. उर्मिला उपानदं नागदिवे,सौ. शांता राजेश भगत,सौ. उषा गोपाल बनकर ,अंकीत नागदिवे , स्वप्निल गेडाम हे ब्रह्मपुरी तालुक्यातील उष्ण तापमानात सुद्धा भर दुपारी "आपकी बार किसान सरकार"नारे देत गावोगावी जाऊन लोकांना माहिती देऊन सभासद नोंदणी करत आहेत.