सिंदेवाही पासून ७ किमी अंतरावर असलेल्या सरळपार गावानजीक ट्रकचालकाने मागून जबर धडक दिल्याने अपघातात दुचाकीस्वार महीला गंभीर जखमी असून 2 किरकोळ जखमी आहेत ही घटना आज शुक्रवारी सकाळी 9.30 ते 10.00 चा वाजताच्या सुमारास घडली. कु. आचल अशोक मांदाळे वय (16 ) राहाणार नवेगाव गडचिरोली. मयुरी अशोक मांदाळे राहाणार नवेगाव. गडचिरोली व अशोक गणपत मांदाळे राहाणार नवेगाव अशी जखमी ची नावे आहेत. एमएच-३४-ए बी - 5942 क्रमांकाचा ट्रक सिंदेवाही कडून मूल कडे जात होता. तसेच MH.33/A/3154 हिरो कंपनीच्या दुचाकीने हे तिघे सिंदेवाही कडून मूल मार्गे नवेगाव गडचिरोली ला जात होते दरम्यान सरळपार गावानजीक ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून जबर धडक दिली. या घटनेनंतर ट्रकचालक .भक्तुण पुरणपाल राहाणार. बल्लारपुर यास अटक केली असून पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.