मागील 25 वर्षांच्या घुग्घुसवासींच्या लढ्याला यश आले आणि नगरपरिषदेची स्थापना झाली. पालिकेच्या पहिल्याच निवडणुकीला घुग्घुसवासी सामोर जाणार आहे. एकूण अकरा प्रभागात 22 नगरसेवक निवडून द्यायचे आहे. द्विसदस्यीय प्रभाग प्रद्धतीनुसार ही निवडणूक होईल. अकरा जागा विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. पहिली निवडणूक असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे या पालिकेच्या निवडणुकीकडे लक्ष लागून आहे. भाजप आणि कॉंग्रेस अशी येथे लढत होईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात आहे. दहा प्रभागात सहा जागा अनुसूचित जाती, एक अनुसूचित जमाती, पंधरा जागा सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे.
नागभीड येथील दहा प्रभागात चार जागा अनुसूचित जमाती, तीन अनुसूचित जाती आणि 13 जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. एकूण 20 नगरसेवक येथून निवडून द्यायचे आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मतदार संघातील ही पालिका आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे.
लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदार संघातील मूल निवडणुकीकडे यावेळी राजकीय वर्तुळाचे लक्ष राहील. मागील दोन दशकापासून या पालिकेवर भाजपचे वर्चस्व आहे. सध्या जिल्ह्यातील कॉंग्रेसचे पालकमंत्री आणि खासदार आहे. त्यामुळे मूल पालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी या दोघांचेही प्रयत्न राहील. त्यामुळे येथील निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. येथे दहा प्रभागातून वीस नगरसेवक निवडले जागील. याआधी आठ प्रभाग होते. नगर परिषदेच्या एकूण 20 जागांपैकी 10 महिला आरक्षित जागेत अनुसूचित जाती 2, अनुसूचित जमाती 1, सर्वसाधारण महिला 7 जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. उर्वरित 10 जागांपैकी अनुसूचित जाती 1, अनुसूचित जमाती 1 खुला सर्वसाधारण 8 जागा ठेवण्यात आलेल्या आहेत.
बल्लारपूर पालिकासुद्धा मुनगंटीवार यांच्याच मतदार संघातील आहे. येथे एकूण 17 प्रभागात अनुसूचित जमातीसाठी दहा, सर्वसाधारण महिलासांसाठी आणि उर्वरित अकार जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे.
चिमूर पालिकेत दहा प्रभागातील 20 सदस्यांपैकी 10 जागा महिलांसाठी राखीव आहे. प्रभाग क्रमांक 1 व 4 अनुसूचित जाती तथा अनुसुचित जमाती करीता प्रभाग क्रमांक 2, 5, 6 व 7 राखूव करण्यात आले.
राजुरा पालिकेवर सध्या कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. विद्यमान आमदार सुभाष धोटे यांचे बंधू अरुण धोटे यांचे आतापर्यंत पालिकेवर एकहाती वर्चस्व राहिले आहे. दहा प्रभागातील 21 जागांसाठी आरक्षण काढण्यात आले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....