कारंजा (लाड) : श्री रुक्मिणी पिठ श्री रुक्मिणी मंदिर, अंबिकापूर - श्रीक्षेत्र कौंडण्यपूर जि.अमरावती येथील श्री गुरुमाऊली,पिठाधिश्वर श्रीमद् जगद्गुरू रामानंदाचार्य राजेश्वर माऊली सरकार,समृद्धी मार्गाने कौंडण्यपूर ते शिर्डी येथे जात असतांना स्थानिक टोलनाक्या जवळील वाल्हई फाट्याजवळ त्यांनी कारंजा येथील शिष्यमंडळीसह भाविकांना दर्शन देऊन शुभाशिर्वाद दिले.यावेळी अकस्मात "न भुतो न भविष्यती" अशाप्रकारे श्री गुरु माऊली सरकार यांच्या भेटीचा अमृत योग आल्यामुळे शिष्यमंडळीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता.याप्रसंगी माऊलीचे शेलुवाडा येथील परम शिष्य रामदास कांबळे,खेर्डा येथील विजय येवले,कारंजा येथील माणिकराव राऊत,अमित राऊत, अनिल पाटील गणेशपुरे, मनोहर पाटील गालट,अँड विजय छल्लानी,धिरज रामदास कांबळे,सिताराम गुरुजी,किरण रामदास कांबळे,जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ कारंजाचे संजय कडोळे,उमेश अनासाने इत्यादी भाविक मंडळीची उपस्थिती होती.