कारंजा -प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2023-24 अंतर्गत नवीन कामाला प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देणे बाबत दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी शासन निर्णय झाला असून त्यानुसार मतदारसंघातील 16 गावांना रुपये पाच कोटी च्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आमदार राजेंद्र पाटणी यांनी प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2023 - 24 अंतर्गत कारंजा मानोरा तालुक्यातील उपरोक्त गावांच्या कामाकरिता प्रशासकीय यंत्रणेमार्फत प्रस्ताव दिले होते त्यास शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता प्रदान करून निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात मान्यता देण्यात आली आहे . प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2023 अंतर्गत जिल्हास्तरावरील नवीन कामांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देणे बाबत महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय मुंबई ,शासन निर्णय टीडीएस 2023/08/प्र .क्र. 346(भाग 3)/पर्यटन . या निर्णयात कारंजा मानोरा तालुक्यांतील खालील गावातील कामांचा समावेश आहे.
गोमुख संस्थान इजोरी तालुका मानोरा येथे डोम सभागृह बांधकाम करणे अंदाजित किंमत 30.00 लक्ष,तुकाराम महाराज संस्थान सावळी तालुका मानोरा येथे डोम सभागृह बांधकाम करणे अंदाजित किंमत30.00लक्ष,आप्पा स्वामी महाराज संस्था पारवा तालुका मानोरा येथे स्लॅब बांधकाम करणे अंदाजित किंमत 30.00 लक्ष,ऋषीश्वर महाराज संस्थान कुपटी तालुका मानोरा येथे डोम सभागृह बांधकाम करणे अंदाजित किंमत
30.00 लक्ष रूपये,नागाबाबा मंदिर संस्थान मनभा तालुका कारंजा येथे डोम सभागृह बांधकाम करणे अंदाजित किंमत
30.00 लक्ष,गजानन महाराज संस्थान उंबर्डा jबाजार तालुका कारंजा येथे डोम सभागृह बांधकाम करणे 50 . 00लक्ष ,
गजानन महाराज संस्थान भूली तालुका मानोरा येथे डोम सभागृह बांधकाम करणे अंदाजित किंमत 30:00 लक्ष,सोमनाथ महाराज संस्थान आसोला खुर्द तालुका मानोरा येथे डोम सभागृह बांधकाम करणे अंदाजित किंमत 30.00 लक्ष,गजानन महाराज संस्थान वाई तालुका कारंजा येथे डोम सभागृह बांधकाम करणे अंदाजित किंमत 30.00लक्ष,दुर्गादेवी मंदिर संस्थान पोहा तालुका कारंजा येथे डोम सभागृह बांधकाम करणे अंदाजित किंमत 30.00 लक्ष ,
भिशनसिंग महाराज संस्थान जानोरी तालुका कारंजा येथे डोम सभागृह बांधकाम करणे अंदाजित किंमत 30.00 लक्ष,मरडिशवर महाराज संस्थान धामणी तालुका कारंजा येथे डोम सभागृह बांधकाम करणे अंदाजित किंमत 30.00 लक्ष ,अमर शक्ती हनुमान मंदिर संस्थान कामरगाव तालुका कारंजा येथे डोम सभागृह बांधकाम करणे अंदाजित किंमत 30 .00 लक्ष ,
मारुती मंदिर संस्थान बेलखेड तालुका कारंजा येथे डोम सभागृह बांधकाम करणे अंदाजित किंमत 30.00 लक्ष,श्री राम सभा संस्था हिवरालाहे तालुका कारंजा येथे डोम सभागृह बांधकाम करणे अंदाजित किंमत 30.00 लक्ष,श्याम की माता मंदिर संस्थान सिंगडोह शिंगणापुर तालुका मानोरा येथे डोम सभागृह बांधकाम करणे अंदाजित किंमत 30 .00लक्ष रुपये .या कामाकरीता लागणाऱ्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यातील काही नमुद निधि सबंधित जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे असे नमूद कऱण्यात आले आहे.
असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांचे स्वीय सहाय्यक यांनी कळविले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....