वाशिम.. येथून जवळच असलेल्या अनसिंग येथील मातोश्री श्रीमती बाई जैन अल्पसंख्यांक शिक्षण संस्था द्वारा संचालित ज्ञानसागर स्कॉलर्स स्कूलमध्ये,वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आदित्यकुमार हुकुमचंद वाळले जैन,अतिथी म्हणून अनसिंगचे ठाणेदार ,प.दी. जैन कला महाविद्यालय प्राचार्य डॉ. विवेक गुल्हाने, प.दी. जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य सौ स्वाती आगरकर,अद्विका कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य खान सर, प्रा. रामेश्वर बोंद्रे सर, संजय वैद्य, किशोर आगरकर, रावणे सर, संस्थेचे सदस्य सुशांत भुरे, प्रणील जैन समवेत मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, माता सरस्वती प्रतिमेचे पूजन हार अर्पण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कला गुणांचे दर्शन घडविले विद्यार्थ्यांच्या कलागुणाने उपस्थित पालक वर्ग व मान्यवरांची मने जिंकली. अनसिंग सारख्या ग्रामीण भागात प्रथमच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संस्थेच्या या उपक्रमाचे पालक वर्गांनी स्वागत केले. सदर कार्यक्रमात बेस्ट टीचर मधून सागर राठोड व पूजा लांडगे यांना संस्थाप्रमुख आदित्यकुमार वाळली यांच्यावतीने सन्मानित करण्यात आले. पालकाच्या वतीने डॉक्टर योगिता सरनाईक यांनी सदर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये संस्थेने कोणत्याही कोरिओग्राफरला न बोलविता स्वतः शिक्षकांनी परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांकडून अत्यंत दर्जेदार सादरीकरण करून घेतले त्यामुळे त्यांनी संस्थेचे शिक्षकांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद नागोलकर ,संचालन सीमा वाळली मॅडम तर आभार ज्ञानसागर स्कॉलर स्कूलचे प्राचार्य प्रियंका जैन मॅडम यांनी मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मान्यवर पालक वर्ग व हितचिंतक उपस्थित होते.