चंद्रपूर : अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. कर्ज काढून उभी केलेल्या शेतीचे नुकसान बळीराजाला असहृय झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जाचा ओझ्याखाली दबलेल्या एका शेतकऱ्याने जिवन संपविण्यासाठी विहीरीत उडी घेतली. शेतकऱ्याला वाचविण्यासाठी काँग्रेसचा तालुका उपाध्यक्षांनेही छलांग लावली. मात्र उपाध्यक्षांचा प्रयात्नाना यश आले नाही. शेतकऱ्याचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला. मारोती विश्वनाथ नाहगमकर असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
यावर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि पुराने शेतीचे अतोनात नुकसान केले. शेतकऱ्यांना तिबार पेरणी करण्याची वेळ ओढावली. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज, हातऊसणवारी करून शेती उभी केली. मात्र शेतीचे नुकसान बघून शेतकऱ्यांचा धिर खचला. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी जिवन संपविले आहे. कर्जाचं ओझं असहृय झाल्याने पोंभुर्णा तालुक्यात येणाऱ्या घोसरी गावातील मारोती विश्वनाथ नाहगमकर ( वय 62 ) या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचललं. जिवन संपविण्यासाठी त्याने विहीरीत उडी घेतली.त्याला उडी घेतांना काही लोकांनी बघितलं. काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रवि मरपलीवार हे विहीरपासून जवळच उभे होते. त्यांना ही घटना कळताच मागचा पुढचा विचार न करता रवि मरपल्लीवार यांनी विहीरीत उडी घेतली. शेतकऱ्याला घेऊन बाहेर काढण्यासाठी टाकलेला पाईपने ते वरा येत होते.मात्र पाईप तुटल्याने दोघेही पुन्हा खोल पाण्यात बुडाले. या दुर्घटनेत मारुती नाहगमकर यांचा मृत्यू झाला. वाचवण्यासाठी जाणारे रवी मरपल्लीवार हे जखमी झाले आहेत. दरम्यान घटनेची माहीती मिळताच मुल पोलीस ठाण्याचे ठाणेदार सतीश सिंह राजपूत यांनी घटनास्थळ गाठले. पुढील तपास पोलीस करीत आहेत