चंद्रपूर आम्ही कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (B.A.M.S.)संपूर्ण महाराष्ट्र राज्यात २०१९ पासून सुमारे १४०० B.A.M.S. वैद्यकीय अधिकारी यांनी ग्रामीण भागात मुख्यालयी राहुन कोरोना महामारीच्या दोन्ही लाटेत उत्तम कार्य पार पाडले व आज पर्यंत पार पाडत आहोत. मागील वर्षी जुन महिन्यात रातो-रात मंत्रिमंडळ निर्णय घेवून राज्य शासनाने कोरोनाच्या दोन्ही लाटा संपल्या असतांना १८९९ M.B.B.S राजपत्रीत वैद्यकीय अधिकारी गट अ यांना कोणतेही शासकीय अनुभव नसतांना कोणतीही MPSC सरळ सेवा मुलाखत न घेता टक्केवारीच्या अनुक्रमाने भरती केली. व प्राथमिक आरोग्य केंद्रातील B.A.M.S वैद्यकीय अधिकारी यांना नोकरी वरून घरी पाठवीले, तसेच या वर्षी २०२२ मध्ये DMRE BOND च्या नावाखाली कार्यरत असणारे जवळपास ५०० BAMS अधिकारी यांना येणाऱ्या १० दिवसात घरी पाठविण्याचा घाट रचला आहे. सदरील ठिकाणी वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र ठिकाणी कार्यरत असताना देखील रीक्तपदे दाखविली असून त्या ठिकाणी नवीन M.B.B.S BONDED यांना रुजु करण्याचा आदेश दिला आहे. तरी हि प्रक्रिया तत्काळ २ दिवसात थांबविण्यात यावी हि कार्यवाही न झाल्यास आम्ही दिनांक १८/०७/२०२२ पासुन काम बंद करून यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर समोर आमरण उपोषणास बसु व त्या उपोषणात कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्यास कसल्याही प्रकारची हानी झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. तरी आमचा सहानुभूतीपुर्वक विचार करण्यात यावा हि विनंती.