अकोला :-दर बारा वर्षांनी प्रयागराज त्रिवेणी संगमवर महा कुंभमेळा होत असतो. देश विदेशातून कोट्यावधी भाविक या कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमाला स्नानासाठी येत असतात त्यासाठी अकोला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने जानेवारी आणि फरवरी महिन्यात शाही स्नान, जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष रेल्वे प्रयाग अयोध्या काशीसाठी सुरू करावी अकोला अमरावती बुलढाणा वाशिम हिंगोली या जिल्ह्यातील भाविक भक्तांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयाने सुरू करावी अशी मागणी खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
लाखो सनातन प्रेमी धर्माच्या आसताचा आस्था श्रद्धा विश्वास भक्ती चा संगम संत महात्मा यांचे दर्शन त्रिवेणी स्नानाचे महत्त्व दर बारा वर्षांनी होत असतात यानिमित्ताने अकोल्या पंचकोशीतील नागरिक मोठ्या संख्येने या शाही स्नानामध्ये जाण्यासाठी सज्ज असून त्यांच्या सुविधेसाठी रेल्वेने अकोला प्रयागराज काशी अयोध्या ही विशेष ट्रेन दोन महिन्यासाठी सुरू करावी तसेच कायम सुरू करावी जेणेकरून उत्तर भारतीय नागरिकांना सुविधा होईल भक्ती आणि श्रद्धा सोबत दक्षिण आणि उत्तर भारत याला एकत्र करणाऱ्या दिशेने महत्त्व प्राप्त होईल व विदर्भातील भाविक भक्तांना सोय होईल या बाबीकडे रेल्वे मंत्रालयाने लक्ष द्यावे व रेल्वेमंत्री न्याय देतील असा विश्वास खासदार अनुप, धोत्रे यांनी व्यक्त करून या संदर्भात नागपूर आणि भुसावळ वरून गाड्या असून अकोल्यातून या दिशेने पाऊले उचलावी व न्याय द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.