स्थानिक देशमुख मंगल कार्यालय डाबकी रोड येथे श्रीराम नाम जप शिबीर श्री राम कथा व पंचकुंडी महायज्ञ अनेक भाविक भक्तांच्या उपस्थितीत सुरू आहे. यामध्ये दररोज श्री राम महायज्ञ सुरू आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक श्री राम भक्ताना श्री राम नामाच्या गजरात स्वाहाकार यज्ञात आहुती देण्याचे भाग्य लाभत आहे. या कार्यक्रमादरम्यान दररोज सकाळी नऊ ते बारापर्यंत श्री राम कथा वक्ते श्रीराम गदारधर शास्त्री यांच्या ओजस वाणीतून सुस्राव्य कथा सुरू आहे. या कार्यक्रमात आज 28 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज श्रीक्षेत्र साखरखेर्डा यांच्या पवित्र पवन चरण पादुकांचे आगमन यज्ञ करिता होणार आहे. या दरम्यान सांप्रदायिक उपासना पंचपदी काकडा आरती इत्यादी कार्यक्रम होणार श्रीराम भक्त प्रेमींनी श्रीराम कृपाप्रसादाचा व सद्गुरु सानिध्याचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री प्रल्हाद महाराज उपासना मंडळ अकोला यांच्या वतीने करण्यात येत आहे.